Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील डाळिंब या फळबाग पिकातून आर्थिक प्रगती साधली आहे. यामुळे सध्या या पैठणच्या मराठमोळ्या शेतकऱ्यांची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पैठण तालुक्याच्या कोळीखोडबा येथील कृष्णा चावरे या प्रयोगशील शेतकऱ्याने डाळिंब शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. कृष्णा चावरे यांनी चक्क खडकाळ जमिनीवर डाळिंब शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे कृष्णा चावरे यांनी केलेल्या डाळिंब शेतीच्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
कृष्णा चावरे या प्रयोगशील शेतकऱ्याविषयी थोडक्यात
मित्रांनो कृष्णा चावरे हे पैठण तालुक्यातील कोळीखोडबा येथील रहिवासी शेतकरी आहेत. कृष्णा चावरे स्वतः एक कृषी सेवा केंद्र चालक आहेत. त्यामुळे शेतीवरची त्यांची समज आणि पकड निश्चितच इतर प्रयोगशील शेतकऱ्यांपेक्षा अधिक आहे. शिवाय त्यांना शेती व्यवसायाची अगदी लहानपणापासून आवड आहे. हेच कारण आहे की त्यांनी शेती व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. पारंपारिक शेती करून भागणार नाही म्हणून त्यांनी डाळिंब फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. या अनुषंगाने कृष्णा चावरे यांनी आपल्या सात एकर खडकाळ जमिनीवर डाळिंब लागवड केली.
सात एकर शेत जमिनीत त्यांनी जवळपास दोन हजार डाळिंबाची झाडे लावलीत. डाळिंब लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. मात्र स्वतः कृषी सेवा केंद्र चालक असल्याने आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करत तसेच कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेत त्यांनी डाळिंब शेती यशस्वी केली. विशेष म्हणजे चावरे यांनी लागवड केलेल्या डाळिंबातून आता उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे.
त्याना डाळिंब बागेतून चांगली कमाई होण्याची आशा आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या डाळिंबाला दोन हजार शंभर रुपये ते हजार शंभर रुपये प्रति कॅरेटचा बाजार भाव मिळत आहे. म्हणजेच 105 ते 155 रुपये प्रति किलो एवढा डाळिंबाला बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांना डाळिंब शेतीतून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे.
कृष्णा चौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची सात एकर वडीलोपार्जित जमीन खडकाळ आहे. ते 2020 पर्यंत या खडकाळ जमिनीवर कापूस तूर कांदा यांसारखी पारंपारिक पिके घेत असत. मात्र जमीन खडकाळ असल्याने या पिकातून त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हते. मग काय त्यांनी शेतीत जरा हटके करण्याचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने त्यांनी शोधा शोध करणे सुरु केले. शेवटी कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत अधिक उत्पन्न देण्यास सक्षम असलेल्या डाळिंब बागांची लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी केलेला हा प्रयोग त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे. निश्चितच कृष्णा यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना दिशा दर्शवणारा ठरणार आहे.