Farmer Success Story : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून तोट्याचा समजला जाणारा शेती व्यवसाय फायद्याचा करून दाखवला आहे. मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या अशाच एका भन्नाट प्रयोगाविषयी जाणून घेणार आहोत.
खरं पाहता हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव आपल्या नवनवीन प्रयोगासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कायमच चर्चेत राहतात. हिंगोली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने खेकडा पालनाच्या माध्यमातून वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई करून दाखवण्याची किमया साधली आहे. त्यामुळे सध्या या अवलिया शेतकऱ्याची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. आज आपण या अवलिया शेतकऱ्याच्या खेकडा पालन या नवीन आणि जरा हटके प्रयोगाविषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील मौजे बाबुळगाव येथील भारत जहरव या प्रयोगशील शेतकरी बांधवाने शेती सोबतच शेतीपूरक व्यवसाय करण्याचे ठरवले. शेतीपूरक व्यवसाय करायचा पण नेमका कोणता व्यवसाय सुरू करायचा हा मोठा प्रश्न सर्वप्रथम भारत यांच्या पुढ्यात उभा राहिला होता. अशा परिस्थिती भारत यांनी ज्या शेतीपूरक व्यवसायात अद्यापपर्यंत शेतकरी बांधवांनी आपली रुची दाखवलेली नाही अशा शेतीपूरक व्यवसायाची निवड केली.
भारत यांनी खेकडा पालन व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. या अनुषंगाने भारत यांनी आपल्या एक गुंठा शेतजमिनीत खेकडा पालन व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी आठ फूट खोल वीस बाय पन्नासचा एक खड्डा खोदला. या खड्ड्यात खेकड्यासाठी अनुकूल असे शेततळे तयार करण्यात आले. या शेततळ्यात त्यांनी दोन क्विंटल खेकडा बीज आणून सोडले आहेत. निश्चितच भारत यांचा खेकडा शेतीचा हा प्रयोग जिल्ह्यात नवखा आहे.
विशेष म्हणजे या प्रयोगासाठी भारत यांनी कुठेच प्रशिक्षण घेतले नाही. त्यांनी youtube वर व्हिडिओ पहात खेकडा शेतीचा निर्णय घेतला असून या व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी सहा लाखांची कमाई होत आहे. अर्थातच एक गुंठे शेत जमिनीतून त्यांना खेकडा शेतीतून तब्बल सहा लाखांची कमाई वार्षिक मिळत आहे.
भारत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना खेकडा पालन सुरू करण्यासाठी चार लाखांपर्यंतचा खर्च आला आहे. आणि यातून त्यांना अवघ्या नऊ महिन्यात सहा लाखांची कमाई झाली आहे. निश्चितच खेकडा पालन हा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. भविष्यात भारत यांनी केलेला प्रयोग इतर शेतकरी देखील आत्मसात करणारा असल्याचे चित्र आहे.