Success Story:- जर आपण विविध फळ पिकांचा विचार केला तर यामध्ये काही विशिष्ट फळपिके ही देशातील विशिष्ट भागांमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादित होतात. कारण त्या ठिकाणचे तापमान आणि एकंदरीत हवामान त्या पिकांना मानवते. या अनुषंगाने जर आपण सफरचंद या फळ पिकाचा विचार केला तर प्रामुख्याने देशातील हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या ठिकाणच्या डोंगराळ आणि थंड भागामध्ये घेतले जाणारे हे पीक आहे. परंतु आता हे पीक बिहार आणि हरियाणा तसेच महाराष्ट्रातील काही शेतकरी देखील यशस्वी करताना दिसून येत असून या माध्यमातून चांगला नफा देखील मिळवत आहेत.
ही जी काही किमया आहे ती सफरचंदाच्या हरीमन 99 नावाच्या जातीमुळे शक्य झालेली आहे. आता आपल्याला माहित आहे की कुठल्याही पिकाचा किंवा फळबागांचा वाण प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित केला जातो. परंतु सफरचंदाची हरीमन 99 ही जात कोणी शास्त्रज्ञाने नव्हे तर दहावी पेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या एका शेतकऱ्याने विकसित केलेली आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याच्या नावावरूनच या सफरचंदाच्या जातीचे नाव ठेवण्यात आलेले आहे व या शेतकऱ्याचे नाव आहे हरीमन शर्मा हे होय. आता त्यांचे वय 66 वर्ष असून संपूर्ण भारतामध्ये सफरचंदाची लागवड करता यावी यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. उद्देशाने त्यांनी जवळजवळ हरीमन 99 या जातीचे 17 लाख रुपयांचे वितरण देशातील विविध राज्यांमध्ये लागवडीकरिता केले आहे.
सफरचंदाच्या हरीमन 99 या जातीचे वैशिष्ट्य
हरी मन 99 या जातीचे त्यांनी वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण मध्ये नोंदणी केली आहे. त्यामुळे हरीमन 99 या जातीचे रोपे तयार करण्याचा एकमेव अधिकार फक्त हरिवंश शर्मा यांनाच आहे. या जातीचे सफरचंद हे कमी थंडगार प्रकाराचे असून ते समुद्रसपाटीपासून सातशे मीटर उंचीवर आणि 40° ते 46 अंश सेल्सिअस तापमानात देखील यशस्वीरित्या लागवड करता येते व त्याचे उत्पादन घेता येते. हरीमन शर्मा यांच्या प्रयत्नामुळे आता थंड ठिकाणी उत्पादित होणारे सफरचंद आता उष्ण माती आणि उष्ण ठिकाणी देखील घेता येणे शक्य झालेले आहे.
हरी मन शर्मा हे बिलास्पुर जिल्ह्यातील घुमरावी तालुक्यातील रहिवासी आहेत. जर आपण 2005 पर्यंत जर विचार केला तर आपण कधीच विचार केला नसेल की थंड प्रदेशात पिकणारे सफरचंद उष्ण ठिकाणी देखील पिकू शकेल. परंतु हरी मन शर्मा यांच्या अथक परिश्रम व दशक भराच्या मेहनतीमुळे हे शक्य झालेले आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले शर्मा यांचे हे काम खूप अतुलनीय आणि अनन्यसाधारण असे आहे. बरेच दिवस ही त्यांनी याकरिता प्रयोग केला व ग्राफ्टिंग चे काम सुरूच ठेवले आणि त्यांना साधारणपणे 1999 मध्ये याबाबतीत यश मिळाले. त्यामुळे आता सफरचंद हे फळपीक थंड प्रदेशाची मक्तेदारी राहिलेली नसून आता उष्ण आणि डोंगराळ भागांमध्ये देखील याचे उत्पादन घेता येणे शक्य झालेले आहे.
शास्त्रज्ञांना जे नाही जमले ते शर्मा यांनी करून दाखवले
जर आपण पाहिले तर हिमाचल प्रदेशातील सफरचंदाच्या लागवडीसाठी हिमाचल प्रदेश सरकारने 1965 मध्ये सिरमौर जिल्ह्यातील नहान जवळील बगथान नावाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उघडले होते. जवळपास हे संशोधन केंद्र समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर उभारण्यात आलेले होते व या ठिकाणी दहा वर्ष कोट्यावधी रुपये खर्च करून सफरचंदाच्या कुठेही येणारी जात विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले व शास्त्रज्ञांना यश मिळाले नाही. यामुळे साधारणपणे 1975 मध्ये हा प्रकल्प बंद पडला. परंतु जे शास्त्रज्ञांना जमले नाही ते हरिमन शर्मा यांनी करून दाखवले. त्यामुळे त्यांचे हे यश केंद्र सरकारने शास्त्रज्ञ यांनी देखील स्वीकारले आहे.