Farmer Success Story : शेती हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे. इतर व्यवसायाप्रमाणेच शेतीमध्ये देखील काळाच्या ओघात बदल घडवून आणणे आवश्यक असते. व्यवसायात जर बदल घडवून आणला नाही तर एकेकाळी आपल्या क्षेत्रात नावलौकिक कमावलेला नोकिया ज्या पद्धतीने आता धूळ खात आहे त्याच पद्धतीने संबंधित व्यवसायात धुळीला मिळावं लागू शकत.
यामुळे कोणत्याही क्षेत्रात किंवा व्यवसायात बदल घडवून आणणे अति आवश्यक असते. शेतीमध्ये देखील काळाच्या ओघात बदल करणे महत्त्वाचे आहे. शेतीमध्ये बदल केल्यास निश्चितच यशस्वी होता येते. हेच दाखवून दिले आहे पुणे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने.
खरं पाहता अलीकडील काही वर्षात लग्न, सण, समारंभासाठी डेकोरेशन करण्याकडे कल वाढला आहे. आता हीच गरज ओळखून पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील जळोचीमधील ऍडव्होकेट जगन्नाथ आत्माराम हिंगणे यांनी अर्नामेंटल सनफ्लॉवर अर्थात सूर्यफुलांची शेती करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
विशेष म्हणजे या शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. सध्या एडवोकेट हिंगणे यांनी शेतीमध्ये केलेला हा बदल चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना कवडीमोल उत्पन्न मिळत आहे तर दुसरीकडे फुलशेतीच्या माध्यमातून ऍडव्होकेट लाखोंची कमाई करत आहेत. यामुळे सध्या एडवोकेट हिंगणे यांची पंचक्रोशीत नवे-नवे तर संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे.
लग्नसराई, तसेच विविध कार्यक्रमांमध्ये डेकोरेशन अनिवार्य झाले आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखत आधुनिक शेती करण्याचा निर्णय बारामती तालुक्यातील जळोचीमधील अँड. जगन्नाथ आत्माराम हिंगणे यांनी घेतला आहे. हिंगणे यांनी १५ गुंठ्यांमध्ये अर्नामेंटल सनफ्लॉवरची लागवड केली आहे. एक गुंठ्यामध्ये दोन हजार फुलझाडे आहेत.
प्रत्येक झाडाला एक फूल येते. त्याला २० ते ३० रुपये भाव मिळतो. १५ गुंठ्यांमध्ये २५ ते ३० हजार इतकी झाडे आहेत. वर्षभर फुलांचे उत्पादन घेता येईल, असे नियोजन त्यांनी केले आहे. एका झाडाच्या बियाची किंमत ही तीन रुपये इतकी असते. लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी हे फूल विक्रीयोग्य होते. पुण्यातील मार्केटयाडांतील फुलबाजारातील किरण ननावरे, शरद कदम आणि खोपडे यांच्याकडे विक्रीसाठी पाठविले. बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट्रतर्फे आयोजित केलेल्या कृषिप्रदर्शनात त्यांना हे फूल पाहायला मिळाले. हिंगणे यांचे बंधू हे १९७४ पासून विश्वस्त आहेत.
हिंगणे यांनी पेरूसोबत मिडो आर्केट अर्थात घनपद्धतीने ६ हजार पेरुचीही लागवड केली आहे. १० लांबी व सहा फूट रुंदी या अंतरावर लागवड केली आहे. तसेच, त्यांची मुलगी अनुपमा यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी पदवी घेतली. सध्या त्या ऑस्ट्रीया येथे अॅटोमॅटीक एनर्जी अँग्रीकल्चर प्रयत्न सुरू आहेत. डिपार्टमेंटमध्ये काम करत आहेत. तेथे फुलशेतीला मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे. सध्या हिंगणे यांनी पिवळ्या
रंगाचे सनफ्लॉवरचे उत्पादन घेतले आहे. तिथे जर्मनीच्या एका कंपनीने पाच रंग विकसित केले आहेत. ते भारतात मागविण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी आयातीचा परवाना लागतो तो मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अँड. हिंगणे यांचे ७० वर्षीय बंधू विष्णु हिंगणे हे देखील कृषी पदवीधर आहेत. ते सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करतात. वडिलांचा अनुभव आणि बंधूंचा अभ्यास या जोरावर आम्ही हिंगणे बंधू शेतीमध्ये यशस्वी घोडदौड करत आहोत.
सहा हिंगणे बंधुंना तब्बल १४० एकर एवढी शेती आहे. गेल्या चार वर्षांपासून ते विभक्त झाले आहेत. हिंगणे परिवाराचे वैशिष्ट्य म्हणजे १७७९ साली पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्डची स्थापना झाल्यापासून शेतमाल विक्रीला पाठवित आहेत. सुरुवातीपासूनच शेतीमध्ये आधुनिकता जपत विक्रमी उत्पादन घेणे हाच त्यांचा ध्यास आहे, अॅड. जगन्नाथ हिंगणे यांचे वडील आत्माराम हिंगणे यांना बऱ्याच वर्षापूर्वी रावबहाद्दूर शेंडेकर पुरस्कार मिळाला आहे. ते द्राक्ष बागायतदार संघाचे संस्थापक होते.
त्यांनी शेतीमध्ये द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, टोमॅटो, कॉलिफ्लॉवर, शेवग्यासह अन्य पिके घेतली आहेत. अलीकडील काही वर्षांत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. अशा परिस्थितीतही हिंगणे यांनी शेतीची आवड तसेच त्यामध्ये आधुनिकता जपत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. याबाबत परिसरामध्ये ते इतर शेतकऱ्यांमध्ये आदर्श मानले जात आहेत. त्यांनी स्वतःच्या मुलीलाही प्रदेशात पाठविले असून त्यांची मुलगीही शेती विषयातच काम करत आहे. त्यामुळे त्यांची शेतीबाबतची आस्था, आवड आणि प्रेम दिसून येत आहे.
सद्यःस्थितीत शेतीमध्ये अर्नामेंटल सनफ्लॉवरचे उत्पादन घेत आहे. डेकोरेशनसाठी या फुलाला मागणी आहे. तसेच घनपद्धतीने पेरूचीही लागवड केली आहे. याशिवाय सनफ्लॉवरचे सध्या भारतात पिवळ्या रंगाचे फूल उपलब्ध आहे. इतर प्रकारच्या फुलांची आयात करण्यासाठीचे
अॅड. जगन्नाथ आत्माराम हिंगणे,
जळोची, ता. बारामती.