Farmer Success Story : आपण नेहमी जय जवान जय किसान असे मोठ्या अभिमानाने म्हणत असतो. मित्रांनो याचं कारणही तसे खास आहे. आपल्या देशातील जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात आणि सीमेच्या आत शेतकरी बांधव (Farmer) आपल्या पोटाची खळगी भरत असतात.
अशा परिस्थितीत दोघांचा जय झालाच पाहिजे. मित्रांनो मात्र राजस्थान मधील एका रिटायर्ड जवानाने (Retired Indian Soldier) देशाचे रक्षण तर केलंच आहे शिवाय त्यांनी शेतीत (Farming) नेत्रदीपक कामगिरी केली असून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. मित्रांनो राजस्थानमध्ये झुंझुनू जिल्ह्यातील एका रिटायर्ड फौजीने चक्क नापीक जमिनीवर शेती करून दाखवली आहे.
विशेष म्हणजे नापीक जमिनीतून लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) देखील करण्याची किमया त्यांनी साधली आहे. यामुळे सध्या हे रिटायर्ड जवान सर्वत्र चर्चेचा विषय बनत आहेत. जमाल पठाण असे या जवानाचे नाव असून या रिटायर्ड फौजीने चांगल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना (Successful Farmer) लाजवेल अशी कामगिरी केली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, जमील पठाण यांनी देशाची सेवा बजावल्यानंतर शेती करण्याचा चांगला निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी 7 एकरपेक्षा जास्त नापीक जमिनीवर शेती करण्याचा प्लॅन आखला.
मात्र नापीक जमिनीवर कस काय शेती केली जाऊ शकते असं म्हणत अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. पण एखादी गोष्ट सिद्ध करण्याचा तसेच एखादी गोष्ट प्राप्त करण्याचा मानस हा चांगला असेल तसेच त्यासाठी केलेले प्रयत्न जर 100% क्षमतेने परिपूर्ण असतील तर निश्चितच ती गोष्ट साध्य केली जाऊ शकते.
जमाल पठाण या सेवानिवृत्त जवानांनी देखील असंच काहीसं करून दाखवल आहे. त्यांनी ओसाड पडलेल्या नापीक जमिनीवर आजच्या घडीला यशस्वी शेती फुलवली आहे. जमाल पठाण यांनी आपल्या नापीक जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फळं, भाजीपाला उगवून दाखवला आहे.
खरं पाहता नापीक जमिनीवर शेती करण्याचा जेव्हा त्यांनी प्लॅन बनवला तेव्हा त्यांच्या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. मात्र जमाल पठाण यांनी रात्रीचा दिवस करून आणि दिवसाची रात्र करून आपली ओसाड जमीन हिरवीगार तर केलीच शिवाय त्यातून लाखो रुपयांची कमाईही केली आहे.
जमील पठाण यांनी त्यांच्या शेतात 20 हजारांहून अधिक झाडे लावली आणि आता त्यांच्या नापीक समजल्या जाणाऱ्या शेतजमिनीत सर्व प्रकारच्या भाज्या सहज पिकत आहेत. जमील पठाण यांनी केवळ शेतीतून लाखोंची कमाई केली आहे असे नाही तर देशसेवा बजावल्यानंतर आता ते शेतकऱ्यांची देखील सेवा करत आहेत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जमील आणि त्यांच्या कुटुंबाने आतापर्यंत 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना शेतीचे गुण शिकवले आहेत. राजस्थानसह देशातील असे अनेक कोपरे आहेत, जिथे नापीक जमीन सतत वाढत आहे.
अशा परिस्थितीत शेती करणे आणि नव्या विचाराने पुढे जाणे हे शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि नापीक जमिनीसाठी जीवनदायी आहे. जमीलचे संपूर्ण कुटुंब आता प्रत्येक प्रकारे शेतीत गुंतले आहे. त्यांचे मुलं शेतकर्यांना शेतीची माहिती देत आहेत,
तर त्यांची सून महिला शेतकर्यांना भाजीपाला आणि फळांबद्दलचे अचूक मापदंड समजावून सांगत आहेत. निश्चितच जमील यांनी कर्तव्यदक्ष फौजी कसा असतो याची प्रचिती जगासमोर मांडली आहे. जमील यांच्या यशामुळे निश्चितच इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळणार आहे.