Farmer Success Story : कोणत्याही क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवण्यासाठी त्यां क्षेत्रातील बारकावे समजून घेणे अतिशय आवश्यक असते. शेतीच्या (Farming) क्षेत्रात देखील काहीसं असंच आहे, या क्षेत्रात जर योग्य नियोजन आखले आणि व्यवसायातील बारकावे समजून घेते तर निश्चितच शेतीतून देखील लाखोची कमाई (Farmer Income) केली जाऊ शकते.
उत्तर प्रदेश मधील कानपूर येथील एका वकिलाने देखील वकिली सोडून शेती व्यवसायात (Agriculture) करिअर बनवण्याचा निर्णय घेतला आणि आज हा अवलिया शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत आहे. कानपूरच्या भवरलाल सिंह नामक वकीलाने ही किमया साधली आहे.
वकिली सोडून शेती सुरू केली
उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील सरसौल ब्लॉकमधील महुवा गावचे रहिवासी भंवरपाल सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात वकीली केली आहे. मात्र काही काळानंतर या अवलियाने वकिली सोडून शेती करण्यास सुरुवात केली. मीडिया रिपोर्टनुसार, 2000 साली आई-वडिलांच्या निधनानंतर तो गावात परत आला आणि शेती करू लागला.
बटाट्याच्या शेतीने समृद्ध केले
भंवरपाल सिंह सांगतात की, बटाट्याला जास्त मागणी असल्याने ते स्वतःच्या 22 एकर जमिनीसह 100 एकर जमीन करारावर घेऊन बटाटे पिकाची शेती (Potato Farming) करत आहेत. त्यांना एकरी 400 ते 500 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. भवरलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हेक्टरी 1 ते 1.5 लाख नफा मिळतो. त्यानुसार त्यांना बटाटा (Potato Crop) लागवडीतून वर्षाला एक कोटीपर्यंत उत्पन्न मिळते.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेत
भंवरपाल सिंग यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2013 मध्ये गुजरात ग्लोबल अॅग्रीकल्चर समिटमध्ये भंवरपाल सिंग यांचा गौरव केला होता. त्याच वेळी, 2020 मध्ये, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी त्यांना गोबल बटाटा कॉन्क्लेव्ह गांधी नगर गुजरातमध्ये उत्कृष्ट बटाटा उत्पादनासाठी पुरस्कार दिला आहे. निश्चितच भवरपाल यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.