Farmer Success Story : मित्रांनो शेती व्यवसायात (Farming) बदल केला तर निश्चितच शेतीव्यवसायातून लाखोंची कमाई (Farmer Income) सहजरीत्या केली जाऊ शकते. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना (Farmer) शेती व्यवसायात बदल करण्याचा सल्ला देतात.
जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी शेती समवेत शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Business) सुरू केला तर त्यांना अतिरिक्त कमाई होऊ शकते. ओडिशातील एका महिला शेतकऱ्यांना देखील ही बाब अधोरेखित करून दाखवली आहे.
ओडिशा मधील एका महिला शेतकऱ्याने डेअरी फार्मिंग व्यवसायाच्या (Dairy Farming) माध्यमातून लाखोंची कमाई करून आत्मनिर्भर बनवून दाखवले आहे. ओडिसा मधील जाजपूर जिल्ह्यातील खैराबाद गावात राहणाऱ्या गीतांजली बेहरा या महिलेने डेअरी फार्मिंग व्यवसायातून (Dairy Farming Business) लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की गीतांजलि ताई (successful farmer) जवळपास पाच वर्षांपासून पारंपरिक दुग्ध व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे एकूण 4 एकर जमीन असून, त्यात त्यांचे घर आणि गोशाळाही बांधलेली आहे. खरं पाहता सुरवातीला गाईने वर्षभर दूध न दिल्याने त्यांना दुग्ध व्यवसायातून (Animal Husbandry) चांगले उत्पन्न मिळत नव्हते आणि उत्पन्नही नियमित होत नव्हते.
अशा परिस्थितीत कुटुंब चालवण्यासाठी गीतांजलीला खूप संघर्ष करावा लागला. खर्च भागवण्यासाठी ती शेअरपीक शेतीही करायची. पण कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या संपर्कात आल्यानंतर तिला उत्पन्न वाढवण्याचे साधन मिळाले आणि आज ती एक यशस्वी दुग्धउद्योजक बनली आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला
कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी त्यांना सांगितले की 2002 मध्ये त्यांच्या घरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या दशरथपूर गावात OMFED चा दूध शीतकरण संयंत्र बसवण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसायातील वाढत्या शक्यता लक्षात घेऊन कृषी शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम त्यांना दुग्धव्यवसाय आणि दूध मूल्यवर्धित उत्पादनांवर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचा सल्ला दिला.
2 गायींपासून झाली सुरवात
डेअरी युनिटसाठी त्यांनी सुरुवातीची गुंतवणूक केवळ त्यांच्या ठेवी आणि कुटुंबाच्या मदतीने केली. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राने त्यांना 20 गायींसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कटक जिल्ह्यातील सालेपूर येथून 2 संकरित गायी खरेदी केल्या आणि त्यांची देशी गाय विकली. आता त्याच्याकडे 18 संकरित जर्सी आणि होल्स्टीन गायी आहेत. याशिवाय ती एक एकर जमिनीवर चाराही पिकवते.
दुग्ध व्यवसायातून तुम्ही किती कमवत आहे गीतांजली ताई
गीतांजली बेहेरा पूर्वी फक्त आपल्या गावातच दूध विकत असत, पण आता त्या मोठ्या प्रमाणावर दुग्ध उत्पादन करत असून दररोज 120 लिटरहून अधिक दूध विकत आहेत. ती कुआखिया संकलन केंद्रातील 90 लिटर दूध राज्य संचालित OMFED ला विकते आणि तिला दररोज सुमारे 2,000 रुपये उत्पन्न यातून मिळते.
याशिवाय ती स्थानिक बाजारपेठेत सुमारे 20 लिटर दूध 34 रुपये प्रति लिटरने विकून दररोज 680 रुपये कमवते. ती दररोज 6-7 किलो पनीर विकून 2500 रुपये कमवते. अशा प्रकारे तिची रोजची कमाई 5000 रुपये आहे आणि खर्च वजा केल्यावर तिला दररोज 2500 रुपये म्हणजेच महिन्याचे 75 हजार नफा होतो म्हणजेचं गीतांजली ताईला वर्षाला 9 लाखांचा नफा होत आहे. निश्चितच शेती व्यवसायात बदल केला तर लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते हे गीतांजलि ताई यांनी दाखवून दिले आहे.