Farmer Success Story : भारतात निम्म्याहून अधिक जनसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. ग्रामीण भागात वसलेल्या गावकऱ्यांचा शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हा उदरनिर्वाहाच एक मुख्य साधन आहे. विशेष म्हणजे आता शेतकरी बांधव शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून नोकरदाराला पण लाजवतील अशी कमाई करत आहेत. काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी आता शेतीमध्ये मोठा बदल करण्यास सुरुवात केली आहे.
केवळ शेती मधून चांगली कमाई करता येणे अशक्य असल्याचे शेतकऱ्यांना उमगल आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आता शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय जसे की पशुपालन, प्रक्रिया उद्योग, पर्ल फार्मिंग, मशरूम फार्मिंग सारख्या व्यवसायात आपले नसीब आजमावायला सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील एका अवलियाने देखील शेतीमध्ये एक नाविन्यपूर्ण प्रयोग करून दाखवला आहे. जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून चक्क खेकडा पालन सुरू केल आहे.
विशेष म्हणजे यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. शेतकऱ्याच्या मते खेकडा पालन सुरू करण्यासाठी खर्च खूपच कमी असून यातून मिळणार उत्पन्न हे इतर पशुपालनाच्या तुलनेत खूपच अधिक आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याच्या मौजे बाभूळगाव येथील शेतकरी भारत जहराव यांनी खेकडा पालन यशस्वी करून दाखवण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या हा पट्ट्या पंचक्रोशीत चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. भारत यांनी आपल्या शेतात वीस बाय पन्नास आणि आठ फूट खोल खड्डे तयार केले. त्यात खेकडा पालन सुरू करणे हेतू शेततळे बनवले.
यामध्ये त्यांनी खेकडा पालन सुरू केले. विशेष म्हणजे भारत यांनी खेकडा पालनासाठी कुठेच प्रशिक्षण घेतले नाही. मग आता तुम्ही म्हणाल विना प्रशिक्षण हे कसं काय झालं. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारत यांनी प्रशिक्षणासाठी युट्युबचा वापर केला आहे. यूट्यूबच्या माध्यमातून भारत यांनी खेकडा पालनाविषयी सर्व बारकावे समजून घेतले आणि खेकडा पालन व्यवसाय यशस्वी करून दाखवले आहे. यावर्षी भारत यांना खेकडा पालन व्यवसायातून सहा लाखांची कमाई झाली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, खेकडा पालनासाठी जे शेततळे बनवण्यात आले त्यात माती टाकली गेली. त्यानंतर त्यामध्ये खेकड्यांचे बीज सोडण्यात आले. यामध्ये नर आणि मादी यांचा समावेश होता. एक वर्ष या खेकड्यांचा सांभाळ करण्यात आला आणि त्यानंतर भारत यांना तब्बल सहा लाखांची कमाई झाली. विशेष म्हणजे खेकडा पालणासाठी खर्च खूपच कमी आहे. भारत यांच्या मते खेकड्यांना चिकन आणि माशांचे वेस्टेज दिले जाते. दर आठ दिवसांनी भारत शेततळ्यातील पाणी बदलून घेतात. भारत यांनी टाकलेल्या बीजमधून नऊ महिन्यात खेकडे विक्रीसाठी तयार झाले आहेत.