Farmer Success Story : गहू या पिकाची राज्यातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात लागवड होते. हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर कमी-अधिक प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, नांदेड इत्यादी भागात सध्या स्थितीला गव्हाची काढणी सुरू आहे. ज्या
शेतकऱ्यांनी वेळेवर गव्हाची पेरणी केली होती अर्थातच 15 नोव्हेंबर पर्यंत गव्हाची पेरणी केली होती तेथील गव्हाची सध्या हार्वेस्टिंग सुरू आहे. पण, यंदा कमी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना गव्हाच्या पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये.
मात्र असे असले तरी काही शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले आहे. राजस्थान मधूनही असेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे.
येथील एका शेतकऱ्याने गव्हाच्या एका विशिष्ट जातीपासून एकरी तब्बल 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवून दाखवले आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्यांची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान येथील भरतपुर जिल्ह्यातील पिपला या गावातील शेतकरी दिनेशचंद तेनगुरीया या शेतकऱ्याने इजरायली गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले आहे.
दिनेशचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी येथे स्थायिक असलेल्या त्यांच्या एका नातेवाईकांकडून या जातीचे गव्हाचे बियाणे मागवले होते. त्यांनी हे बियाणे सातशे रुपये प्रति किलो या दराने खरेदी केले.
सातशे रुपये प्रति किलो या दराने दहा किलो गव्हाचे बियाणे खरेदी केल्यानंतर त्यांनी या गव्हाची त्यांच्या शेतात पेरणी केली. दरम्यान त्यांनी पेरणी केलेल्या या गव्हाच्या पिकातून त्यांना सामान्य गव्हाच्या तुलनेत तीन पट अधिकचे उत्पादन मिळण्याची आशा आहे.
ते सांगतात की या गव्हाची पेरणी केल्यानंतर 20 दिवसांनी पहिले पाणी द्यावे लागते. या गव्हाची विशेषता म्हणजे याच्या ओंब्या या सामान्य गव्हापेक्षा तीन पट अधिक लांब असतात.
या गव्हाचे दाणे हे अधिक वजनदार आणि मोठे असतात. विशेष म्हणजे या जातीचे गव्हाचे बियाणे पेरणी करताना एकरी पाच किलो बियाणे पुरेसे ठरते.
तसेच यातून 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. अर्थातच या जातीच्या पाच किलो गव्हाच्या बियाण्याची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना 40 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळते.