Farmer Scheme : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. खरंतर, शेतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशांची निकड भासत असते. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांसाठी शासनाने पीक कर्जाची योजना सुरू केली आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज खूपच कमी व्याजदरात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना मोठा हातभार लागत आहे.
शासनाव्यतिरिक्त बँकेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. दरम्यान, पुणे जिल्हा बँकेने देखील शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत बँकेकडून शेतकऱ्यांना एकरी दीड लाखांपासून ते जास्तीत जास्त सात लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे हे कर्ज पीक कर्जाव्यतिरिक्त दिले जात आहे.
अर्थातच हे मध्यम मुदत स्वरूपातील कर्ज असून यामुळे सदर बँकेतील खातेधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत आहे. दरम्यान पुणे जिल्हा बँकेने सुरू केलेल्या याच योजनेत आता थोडासा बदल करण्याचा निर्णय बँकेने घेतलेला आहे.
योजनेत काय बदल झाला
पुणे जिल्हा बँकेने सुरू केलेल्या या योजनेला बळीराजा कर्ज योजना म्हणून ओळखले जाते. या बळीराजा कर्ज योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बँकेकडून एकरी दीड लाखांपासून ते जास्तीत जास्त सात लाख रुपयांपर्यंतचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते.
मात्र या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्यांना तीन महिन्यांनी हप्ता भरावा लागतो. यामुळे या योजनेबाबत शेतकऱ्यांमधून काही नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही नाराजी लक्षात घेता या कर्ज परतफेडीबाबत बँकेने मोठा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाचा हप्ता दर तीन महिन्यांनी भरणे शेतकऱ्यांसाठी शक्य होत नाही. कारण की शेतकऱ्यांकडे वर्षातून कमाई येते. यामुळे या कर्जाचा हप्ता हा बारामाही असला पाहिजे अशी मागणी होती.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मध्यम मुदत कर्जासाठी तिमाही ऐवजी वार्षिक हप्ता करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
बँकेच्या संचालक मंडळाने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.