Farmer Scheme : राज्यातील शेतकरी बांधव शेती सोबतच पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात करतात. शेतीशी निगडित व्यवसाय सगळ्यांना पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र असे असले तरी पशुपालन व्यवसायात म्हणजेच दुधाच्या व्यवसायात काही रिस्की फॅक्टर देखील आहेत.
विशेष म्हणजे दिवसेंदिवस या व्यवसायात रिस्क वाढत चालली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पशुखाद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इंधनाचे, मजुरीचे आणि पशुधनाच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
जनावरांना मोठ्या प्रमाणात आजार देखील होत आहेत. यामुळे दुधाळ जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाली आहे. याशिवाय वाढती महागाई देखील या व्यवसायासाठी अपायकारक ठरत आहे. या साऱ्या कारणांमुळे आता दुधाच्या व्यवसायातला उत्पादन खर्च वाढला आहे.
दुसरीकडे, दुधाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. या साऱ्या संकटांमुळे दुधाचा धंदा आता शेतकऱ्यांना परवडत नाहीये. हेच कारण आहे की राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गाईच्या दुधाला अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये एवढे अनुदान देण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे. मात्र अजूनही अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळालेला नाहीये. दरम्यान याच शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध अनुदान योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पारनेर येथील दूध व्यावसायिकांनी भेट घेतली होती.
यावेळी दूध उत्पादक व्यवसायिकांनी आपली व्यथा महसूलमंत्र्यांसमोर मांडली होती. यावेळी, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री विखे पाटील यांनी मार्च 2024 अखेरपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पैसा मिळेल असे म्हटले आहे.
तसेच याबाबत अधिकची माहिती देताना त्यांनी पारनेर तालुक्यातील दूध उत्पादकांना ७० कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे सांगितले आहे. या योजनेची सुरुवात 11 जानेवारी 2024 ला झाली आहे. ही योजना सुरूवातीला एका महिन्यासाठी राबवली जाणार होती.
11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत दूध विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार होते. मात्र आता या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून 10 मार्चपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. मात्र अजूनही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा पैसा मिळालेला नाहीये.
तथापि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च 2024 अखेरपर्यंत या योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन यावेळी दिले असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.