Farmer Scheme : केंद्रातील मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा बजेट पुढल्या महिन्यात सादर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा बजेट सादर करतील. दरम्यान या पुढील बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत.
अशा परिस्थितीत निवडणुकांपूर्वीच मोदी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यात ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होत आहे.
आता मात्र या रकमेत वाढ होणार अशी शक्यता आहे. ही रक्कम तब्बल दोन हजार रुपयांनी वाढवली जाणार असे काही मीडिया रिपोर्ट मध्ये बोलले जात आहे.
म्हणजेच या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना वार्षिक आठ हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो. याबाबतचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
तथापि, याबाबत केंद्रातील मोदी सरकारने अजून कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
निश्चितच जर केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 15 हप्ते मिळालेले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना सोळाव्या हफ्त्याची आतुरता लागलेली आहे.
15 वा हफ्ता 15 नोव्हेंबर 2023 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. हा मागील 15 वा हफ्ता देशातील साडेआठ कोटी पात्र शेतकऱ्यांना मिळाला होता.
आता सोळावा हफ्ता देखील या कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी जारी केला जाणार आहे. पुढील 16 वा हप्ता हा मार्च 2024 अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी आशा आहे.