Farmer Scheme : राज्यासह संपूर्ण देशात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशातील बहुतांशी नागरिकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. हेच कारण आहे की, शेती क्षेत्राला उभारी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक शेती हिताच्या योजना राबवल्या जात आहेत.
या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. खरे तर महाराष्ट्रासह देशात कडधान्य आणि तृणधान्य पिकांची मोठ्या प्रमाणात शेती होते.
यामुळे कडधान्य आणि तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये कडधान्य आणि तृणधान्य साठवण्यासाठी घरगुती कोटी देखील उपलब्ध करून दिली जात आहे. धान्य साठवण्यासाठी शेतकऱ्यांना घरगुती कोटी करीता शासनाच्या माध्यमातून अनुदान पुरवले जात आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य) व पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम सन 2023-24 च्या माध्यमातून यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला पाच क्विंटल म्हणजेच 500 किलो धान्य साठवण्यासाठीच्या कोटीला अनुदान दिले जात आहे.
दरम्यान यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करायचे आहेत.
कोणाला आणि किती अनुदान मिळणार ?
या योजनेअंतर्गत पाच क्विंटलच्या धान्याच्या कोटीसाठी किमतीच्या 50% किंवा 2,000 रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे. मात्र दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जर अर्ज जास्त आलेत तर लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भुधारक इतर शेतकरी पात्र राहणार अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून समोर आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून डीबीटी पद्धतीने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग केली जाणार आहे. शेतकरी बांधव या योजनेबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधू शकतात.