Farmer Scheme : भारतातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Government) 2018 साली एक महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) असे या योजनेचे नाव.
या योजनेच्या (Farmer Scheme) माध्यमातून देशभरातील जवळपास दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, या योजनेच्या (Agricultural Yojana) माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना (Farmer) वार्षिक सहा हजार रुपयांची मदत सरकारकडून (Government) दिली जाते.
वर्षाकाठी दिले जाणारे हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकूण तीन हप्त्यांत दिले जातात. म्हणजे शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता या योजनेच्या माध्यमातून मिळत आहे. या योजनेमुळे (Sarkari Yojana) देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
महाराष्ट्रातील देखील एक कोटीच्या आसपास शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Maharashtra Farmer) एक आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी देखील समोर येत आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार आणि मीडिया रिपोर्ट मध्ये केलेल्या दाव्यानुसार, महाराष्ट्रातील शिंदे (eknath shinde) सरकार देखील केंद्र सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्यात मुख्यमंत्री किसान योजना राबवण्याचा विचार करत आहे.
शिंदे फडणवीस यांची ही बहुचर्चित जोडी लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत देखील शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये मिळणार आहेत. निश्चितच राज्य शासनाने जर मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली तर राज्यातील शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळणार आहे.
मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकार लवकरच मुख्यमंत्री किसान योजनेसंदर्भात आवश्यक निकष जाहीर करणार आहेत. निश्चितच पीएम किसान सम्मान निधि योजनेसारखी (Pm Kisan Yojana) योजना महाराष्ट्रात सुरू झाल्यास राज्यातील लाखों शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.