Farmer Scheme: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) असल्याने देशाची सर्व अर्थव्यवस्था शेतीवरच (Farming) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) सुधारण्यासाठी शासनस्तरावर वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात.
या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करते. शिवाय शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा प्रयत्न असतो. अशा परिस्थितीत 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Government) देखील 2019 पासून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.
या योजनेचे नाव पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana) असे आहे. या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करत असते. या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे सहा हजार रुपये एका वर्षात तीन समान हफ्त्याच्या स्वरूपात दिले जातात.
म्हणजेच प्रत्येकी दोन हजार रुपयाचे तीन हप्ते एका वर्षात पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने या योजनेच्या पात्र 12 कोटी शेतकऱ्यांना 11 हप्ते हस्तांतरित केले आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, आपल्या राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
या योजनेचा अकरावा हफ्ता पात्र शेतकऱ्यांना मिळाला असल्याने आता या योजनेच्या पात्र शेतकर्यांना बाराव्या हप्त्याची आतुरता लागली आहे. शेतकरी बांधव आता या योजनेच्या बारीक-सारीक अपडेट कडे लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आता या योजनेचा 12 कोटी शेतकऱ्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये केंद्रातील मोदी सरकार 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या आता वेगाने पसरत आहेत. असे मानले जाते की, सरकार सप्टेंबर महिन्यात 12 व्या हप्त्याचे 2,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना पाठवू शकते, ज्यामुळे 12 कोटींहून अधिक लोकांना फायदा होईल. अधिकृतपणे, सरकारने अद्याप हप्ता पाठवण्याची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु सर्व बातम्यांमध्ये असा दावा केला जात आहे.
आता शेतकरी बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या हप्त्याचे पैसे ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान येणे अपेक्षित आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबरपासून सरकार देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 12 वा हप्ता वर्ग करू शकते. दुसरीकडे, सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली आहे.
त्याच वेळी, सूत्रांनी असेही म्हटले आहे की, 31 जुलैनंतर ई-केवायसीची तारीख वाढविली जाणार नाही. अशा परिस्थितीत, ज्यांनी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी केले आहे त्यांनाच भविष्यात पीएम किसान निधीचा लाभ मिळू शकेल. यामुळे तुम्ही अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा.