Farmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे. ग्रामीण भागातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेगवेगळ्या योजना देखील कार्यान्वित केल्या जातात.
शेतकरी बांधवांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा शासनाचा मानस असतो. प्रधानमंत्री किसान मानधन योजना हीं देखील अशीच कल्याणकारी योजना आहे. हीं एक केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सरकारी नोकरदाराप्रमाणे पेन्शन देण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना तब्बल 3000 रुपयांपर्यंत पेन्शन दिले जाते.
मात्र यासाठी शेतकरी बांधवांना काही ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागत असते. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेसाठी शेतकरी बांधवांना किती रक्कम भरावी लागते आणि शेतकरी बांधवांना पेन्शनचा लाभ कशा पद्धतीने मिळतो याविषयी सविस्तर पण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
पीएम किसान मानधन योजनेसाठी पात्रता आणि योजनेचे स्वरूप
पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या वयोगटानुसार ठराविक रक्कम गुंतवणूक करावी लागते. महिन्याकाठी 22 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना रक्कम गुंतवावी लागते. या योजनेत सहभागी होण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकरी बांधव पात्र ठरतात. या योजनेचा लाभ केवळ अत्यल्प तसेच अल्पभूधारक भारतीय शेतकरी घेऊ शकतात. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी किंवा दोन हेक्टर पर्यंत शेतजमीन आहे असे शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, या योजनेचा आतापर्यंत 19 लाख 23 हजार शेतकरी बांधवांनी लाभ घेतला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इतकी गुंतवणूक करावी लागेल
मित्रांनो पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अठरा वर्षांवरील शेतकरी बांधवांना मासिक 22 रुपये जमा करावे लागणार आहेत. तसेच तीस वर्षांवरील शेतकरी बांधवांना 110 रुपये महिन्याकाठी जमा करावे लागणार आहेत. याशिवाय चाळीस वर्षांवरील शेतकरी बांधवांना 200 रुपये महिन्यासाठी जमा करून पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या वयोगटाुसार प्रीमियमची रक्कम भरल्यानंतर त्यांना आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकणार आहे. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून योजनेसाठी गुंतवणूक केलेल्या शेतकरी बांधवांना वार्षिक 36 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
गुंतवणूकदार शेतकरी बांधवांचा मृत्यू झाल्यास…
मित्रांनो, या योजनेमध्ये गुंतवणूकदार शेतकरी बांधवांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास गुंतवणूकदार शेतकरी बांधवांच्या पती किंवा पत्नीला या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक केलेले पैसे हे सुरक्षित राहणार आहेत. मात्र या योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सदर शेतकरी बांधवांच्या पती किंवा पत्नीला किंवा वारसदाराला महिन्याकाठी एक हजार पाचशे रुपये पेन्शन स्वरूपात मिळणार आहेत.
पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक या कागदपत्रांची आवश्यकता राहणार आहे.
पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या योजनेसाठी अर्ज करणे हेतू शेतकरी बांधवांना ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. यासाठी शासनाने एक अधिकृत संकेतस्थळ विकसित केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmkmy.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन शेतकरी बांधव अर्ज करू शकणार आहेत. याशिवाय शेतकरी बांधव आपल्या जवळच्या सीएससी सेंटर म्हणजेच आपले सेवा केंद्रला भेट देऊन देखील योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.