Farmer Scheme : भारतात अनेक दशकांपासून उत्पादन वाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनिर्बंध वापर सुरू आहे. रासायनिक खतांचा अमर्यादित वापर केल्यामुळे शेतजमिनीचा दर्जा सातत्याने खालावत चालला असून जमीन नापीक बनण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हळूहळू शेतीजमीन आपले सार गमावत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) आता खूपच कमी उत्पादन मिळत आहे. एवढेच नाहीतर रासायनिक खतांचा वापर करून उत्पादित केलेला शेतमाल मानवी आरोग्यासाठी देखील घातक सिद्ध होत आहे. यामुळे आता शेतकरी बांधवांना रासायनिक खतांचा मर्यादित वापर करण्यास प्रोत्साहित केले जात आहे तसेच सेंद्रिय शेतीला (Organic Farming) चालना देण्याचे काम केले जात आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, रासायनिक खतांमुळे होणारे नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला (Farming) चालना देण्यासाठी अनेक योजना संपूर्ण भारतवर्षात राबविल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून देशात जैविक शेतीला (Natural Farming) प्रोत्साहन दिले जात आहे.
‘परंपरागत कृषी विकास योजना’ देखील अशीच एक शेतकरी हिताची (Agriculture Scheme) आणि महत्त्वाची योजना (Government Scheme) आहे. या योजनेचा अंमल संपूर्ण भारत वर्षात लागू आहे. शेतकर्यांना रसायनमुक्त शेतीकडे नेणे हा या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वप्रथम सेंद्रिय शेतीचे फायदे तर जाणून घ्या
मित्रांनो जाणकार लोक सांगतात की, सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती हे जगाचे उद्याचे भविष्य आहे. रासायनिक खतांमुळे होणारे गंभीर परिणाम पाहता येत्या काळात सर्व देशांना सेंद्रिय शेतीकडे वळावे लागणार असल्याचे तज्ञ लोकांकडून सांगितले जात आहे.
मित्रांनो रासायनिक खतांचा वापर करून उत्पादित केलेला शेतमाल सेवन केल्याने जगात अनेक आजार सातत्याने वाढत आहेत. यामुळे आता रासायनिक शेती ऐवजी सेंद्रीय शेती करणे अतिशय महत्त्वाचे झाले असून. जाणकार लोकांच्या मते, सेंद्रिय शेतीच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर सेंद्रिय शेतीमुळे अनेक फायदे होतात. सेंद्रिय शेतीमुळे मानवी आरोग्यापासून उत्पन्नापर्यंत अनेक प्रकारचे फायदे होतं आहेत.
आता या योजनेचे उद्दिष्ट तर समजून घ्या
मित्रांनो, सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. आपले राज्य सरकारदेखील सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न करत आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मोदी सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 2016 मध्ये ही योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो केंद्राच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ज्यामध्ये 31 हजार पहिल्या वर्षी हस्तांतरित केले जाणार आहेत. जेणेकरून यामुळे शेतकरी बांधव सेंद्रिय खत, सेंद्रिय कीटकनाशके आणि चांगल्या दर्जाच्या बियाणांची व्यवस्था करू शकतील आणि उर्वरित 8 हजार 800 पुढील 2 वर्षांत शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. जे शेतकरी प्रक्रिया, पॅकेजिंग, कापणी तसेच विपणन करण्यासाठी वापरू शकतील.
सर्वात महत्वाचे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
प्रथम अर्जदार भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकरी असणे देखील आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न आणि वयाचा पुरावा, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट pgsindia-ncof.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे.