Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. अशातच राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रयोगासाठी प्रोत्साहित करायला, त्यांनी पिकांचे चांगले उत्पादन घ्यावे म्हणून महाराष्ट्र कृषी विभागाच्या माध्यमातून पीक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
या स्पर्धेअंतर्गत चांगले उत्पादन मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळत असते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागेल आणि ते अधिक उत्पादन घेतील असा मानस शासनाचा आहे. या पीक स्पर्धेच्या माध्यमातून तालुका स्तरावर, राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर पुरस्काराचे वितरण केले जाते.
यामध्ये रोख रक्कम म्हणून पुरस्कार दिला जातो. सोलापूर जिल्ह्यातही पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी महोदय बाळासाहेब शिंदे यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना यामध्ये भाग्य घेण्याचे आवाहन केले आहे. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी पीक स्पर्धा आयोजित केली जाते.
आता रब्बी हंगामासाठी गहू हरभरा करडई जवस ज्वारी या पाच पिकांचा समावेश यामध्ये आहे. या पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2022 ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत तालुकास्तरावर जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे विजेते निवडले जाणार आहेत.
खरं पाहता राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पीक स्पर्धा ही या आधी देखील घेतली जात होती. मात्र सोलापूर जिल्ह्यासाठी हा पहिलाच प्रयोग. यामुळे यंदा फक्त तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा मात्र सोलापूर जिल्ह्यात यावर्षी होणार नाही.
असं राहणार बक्षिसचे स्वरूप
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या पीक स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन विजेते निवडले जाणार आहेत. यामध्ये तालुका पातळीवरील सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे बक्षीस ३ हजार रुपये, तिसरे बक्षीस २ हजार रुपये राहणार आहे.
जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये तिसरे बक्षीस ५ हजार रुपये असणार आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रुपये ५० हजार रुपये दुसरे बक्षीस ४० हजार रुपये, तिसरे बक्षीस ३० हजार रुपये असणार आहे.