Farmer Scheme : मित्रांनो देशात शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी अनेक कल्याणकारी योजना (Agriculture Scheme) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2018 मध्ये सुरु करण्यात आलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) देखील समावेश करण्यात आला आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आतापर्यंत या योजनेच्या (Yojana) माध्यमातून 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत. आता ताज्या अपडेटनुसार, 12वा हप्ता रिलीज होण्यास जास्त वेळ शिल्लक नाही.
सप्टेंबर महिन्याच्या कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता पाहता येईल. मात्र, सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेशिवाय पीएम किसान मानधन योजनेतूनही (Pm Kisan Mandhan Yojana) शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे.
या योजनेंतर्गत 60 वर्षाहून अधिक शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जात आहेत. मित्रांनो ज्या पद्धतीने सरकारी नोकरदारांना पेन्शन दिले जाते अगदी त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना देखील पेन्शन मिळावे या अनुषंगाने शासनाने ही योजना सुरू केले आहे. शेतकरी बांधवांना उतारवयात पेन्शनचा आधार लाभावा यासाठी शासनाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला आहे.
हे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
मित्रांनो, या योजनेसाठी मायबाप शासनाने काही निकष देखील लावून दिले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार या योजनेत तेच शेतकरी नोंदणी करू शकतात, ज्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे. याशिवाय शेतकऱ्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. वयाच्या 30 व्या वर्षी 110 रुपये आणि वयाच्या 40 व्या वर्षी 200 रुपये.
वार्षिक 36 हजार रुपये दिले जातील
ही रक्कम या योजनेंतर्गत 60 वर्षांसाठी शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. वयाच्या 60 वर्षांनंतर त्याचा परतावा शेतकऱ्यांना पेन्शनच्या स्वरूपात दिला जाईल. या योजनेंतर्गत सरकार दरमहा शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन देणार आहे, म्हणजे एका वर्षात 36 हजार रुपये.
मानधन योजनेसाठी नोंदणी कशी करायची बर
ज्या शेतकरी बांधवांना या योजनेत गुंतवणूक करायची असेल आणि उतारवयात पेन्शन मिळवायचे असेल त्यांना प्रथम जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. कॉमन सर्विस सेंटर मध्ये तुम्हाला या योजनेसाठी फॉर्म भरावा लागेल.
तेथे तुम्हाला तुमची, कुटुंबाची, वार्षिक उत्पन्नाची आणि तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.
यासोबतच पैसे घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर तेथे सापडलेला अर्ज तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करा.
यानंतर तुम्हाला पेन्शन खाते क्रमांक दिला जाईल.