Farmer Scheme : शेती करण्यासाठी जमीन पाणी आणि वीज हे तीन घटक सर्वात महत्त्वाचे आहेत. शेतीतून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पिकांना वेळेवर पाणी देणे अपरिहार्य आहे. पिकाला पाणी देण्यासाठी वीज देखील अत्यावश्यक आहे. मात्र अजूनही आपल्या राज्यात अनेक शेतकरी बांधवांच्या शेतीपंपाना 24 तास विजेचा पुरवठा होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतकरी बांधवांना 24 तास विजेचा पुरवठा केला जावा या हेतूने एक कल्याणकारी योजना राज्यात अमलात आणली आहे.
या योजनेचे नाव मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना असे आहे. खरं पाहता ही योजना 2017 मध्ये सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन मेगावॉटपर्यंत वीज निर्मितीचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्यासाठी शेतकरी बांधव आपली शेत जमीन भाडेतत्त्वावर देतील त्यांना मोबदला देण्याचे प्रावधान देखील आहे.
या योजनेच्या माध्यमातून वीज तयार करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीच्या मोबदल्यात एकरी 30 हजार रुपये वार्षिक देण्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच शेतकरी बांधव आपली शेतीजमीन भाडेतत्त्वावर देऊन वर्षाकाठी एकरी 30 हजार रुपये न काही करता कमवू शकणार आहेत. शिवाय यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील वीज मिळणार आहे. मित्रांनो खरं पाहता राज्यातील एकूण वीज उपयोगापैकी 30% वीज ही केवळ शेती क्षेत्रासाठी आवश्यक असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी या अनुषंगाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना आहे तरी नेमकी कशी
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की महावितरणच्या उपकेंद्रापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत जमिनीवर सौर ऊर्जेचा प्लांट उभारून 2 मेगावॉट वीज निर्मितीच टार्गेट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारी वीज ही केवळ शेतीपंपासाठी उपयोगात आणले जाणार आहे. यामुळे खेड्यापाड्यात वीजपुरवठा होणे शक्य होणार आहे. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून 33 केवी उपकेंद्रापासून पाच किलोमीटरच्या हद्दीत तीन एकर ते 50 एकरपर्यंतची जमीन वीज निर्मितीसाठी दिली जाऊ शकते. यासाठी सदर जमिनीच्या मालकाला योग्य तो मोबदला दिला जातो.
एखाद्या शेतकरी बांधवांनी निर्मितीसाठी आपले शेत जमीन महावितरणाला दिले तर त्यांना एकरी तीस हजार रुपयांपर्यंतचा मोबदला दरवर्षी मिळणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या अधिक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंता तसेच उपकेंद्रांच्या उपअभियंत्यांना संपर्क करावा. या ठिकाणी शेतकरी बांधवांना या योजनेबाबत अधिक विस्तृत माहिती मिळू शकणार आहे. तसेच योजनेसाठी आवश्यक प्रक्रिया देखील समजणार आहे.