Farmer Scheme : मित्रांनो शेती (Farming) म्हटलं की पाणी आलंच. पाण्याविना शेती (Agriculture) जवळपास अशक्य आहे. अलीकडे मातीविना शेती शक्य झाली आहे मात्र पाण्याविना शेती अद्याप आणि भविष्यात देखील शक्य होणार नाही.
शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीसाठी पाण्याची सोय करावी लागते. यासाठी शेतकरी बांधव कूपनलिका किंवा विहीर खोदत असतात. विहीर खोदण्यासाठी शेतकरी बांधवांना मोठ आर्थिक भांडवल लागत असते.
अनेक शेतकरी बांधवांना विहीर खोदण्यासाठी भांडवल उपलब्ध करता येत नाही त्यामुळे त्यांना पाण्याची चणचण भासत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाने एक महत्त्वाकांक्षी योजना (Yojana) आणली आहे.
या योजनेच्या (Agriculture Scheme) माध्यमातून शेतकरी बांधवांना विहीरी साठी अनुदान (Subsidy) दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक पाण्याची सोय करण्यासाठी विहीर खोदण्यास मदत होते.
मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अशी एक योजना आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले जात असते. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांना विहीर खोदण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण हा शासनाचा मानस आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना ही योजना अनुसूचित जाती अर्थातच नवबौद्ध शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून राबवली जात आहे.
मित्रांनो ही योजना राज्यातील मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली व कोल्हापूर हे जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यात राबवली जात आहे. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून अडीच लाख रुपयांचे नवीन विहीरी साठी अनुदान दिले जात आहे. तसेचं या योजनेमध्ये जुन्या विहिरीच्या दुरुस्तीच देखील प्रावधान आहे.
या योजनेच्या माध्यमातून जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. राज्यातील नवबौद्ध शेतकरी बांधव Mahadbt Farmer Scheme Portal या शासनाच्या अधिकृत पोर्टलवर या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे नेमकी कोणती बर :-
मित्रांनो ही योजना राज्यातील नवबौद्ध म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे नवीन विहिरीसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अर्जदार शेतकरी बांधवाकडे असणे गरजेचे असते.
तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी 7/12 व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
नवीन विहीर अनुदानासाठी अर्जदार शेतकरी बांधवांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागतो.
अर्जदार शेतकरी बांधव अपंग असल्यास त्याचा पुरावा देखील संबंधित शेतकऱ्याला सादर करावा लागणार आहे.
यासोबतच हे अनुदान नवीन विहिरी साठी मिळतं असल्याने विहीर नसल्याचे प्रमाणपत्र आणि शेतजमिनीचा दाखला लागणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून जुनी विहीर दुरुस्ती साठी देखील अनुदान आहे, अशा परिस्थितीत विहीर असल्यास विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा यांचा तपशील द्यावा लागणार आहे.
त्याचबरोबर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला असणे आवश्यक.
याशिवाय कृषि अधिकाराची क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र असणे देखील गरजेचे आहे.
गट विकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र व जागेचा फोटो देखील लागतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी आवश्यक पात्रता:-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरीच्या अनुदानासाठी सदर व्यक्ती अनुसूचित जाती प्रवर्गातील म्हणजे एससी कॅटेगिरीचा असणे आवश्यक आहे. इतर प्रवर्गातील शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र नसणार आहेत.
अनुसूचित जातीमध्ये असलेल्या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत नवीन विहीरसाठी तसेच जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी अनुदानाचा लाभ घेणे हेतू जातीचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.
सदर व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही दीड लाखापर्यंतच असणे आवश्यक आहे. यासाठी सदर अर्जदार शेतकरी बांधवांना उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो.
या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकरी बांधवाच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. यासाठी अर्जदार शेतकरी बांधवांना जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करावा.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे 0.20 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) जमीन असणे अनिवार्य आहे.