Farmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर (Farming) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी केंद्र सरकारकडून कायमच वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Farmer Scheme) कार्यान्वित केल्या जातात.
केंद्र सरकारने (Central Government) प्रत्येक शेताला पाणी आणि पिकासाठी सिंचन व्यवस्था वेळेवर मिळावी यासाठी अशीच एक शेतकरी हिताची योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना असे ठेवण्यात आले असून ही एक केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत, नवीन सिंचन तंत्राचा अवलंब केल्यास सिंचनावर 45% ते 55% पर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे शेतीसाठी पाणी एक अत्यंत आवश्यक घटक आहे. पिकाला पाणी देण्यासाठी व पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी ठिबक सिंचन प्रणाली सारख्या आधुनिक तंत्राचा वापर होणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की शासन ठिबक सिंचन प्रणाली सारख्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी सिंचनाच्या अनेक योजना कार्यान्वित करीत आहे.
अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत (Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana) ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि रेन गन सिंचन तंत्राचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. आज देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमुळे थेंब थेंब पाण्याचे महत्त्व समजले असून ते कमी खर्चात पिकांचे बंपर उत्पादन घेत आहेत.
ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 55% अनुदान मिळणार बर…!
पाणीटंचाईच्या काळात पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीला चालना देण्यात येत आहे. या सिंचन तंत्राचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना 55% अनुदान दिले जात आहे. ही एक केंद्राची योजना असल्याने देशातील सर्व राज्यातील शेतकरी बांधवांना याचा फायदा घेता येणार आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन प्रणाली बसविण्याच्या खर्चाच्या 55% अनुदान दिले जाते.
सिंचनासाठी सामान्य पद्धतीचा अवलंब करूनही शेतकऱ्यांना 45 टक्के आर्थिक अनुदान देण्याची तरतूद आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
या योजनेंतर्गत सिंचनावरील अनुदानाची रक्कम केंद्र व राज्य सरकार एकत्रितपणे उचलते.
याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकरी कमी खर्चात सिंचन सुविधेचा लाभ घेऊ शकतो.
विशेषत: ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची शेतीयोग्य जमीन आहे, ते अनुदानासाठी अर्ज करू शकतात.
देशातील प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक वर्गातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल.
या योजनेंतर्गत बचत गट, कृषी न्यास, सहकारी संस्था, निगमित कंपन्या, शेतकरी उत्पादक संस्था यांचे सदस्यही अनुदानास पात्र असतील.
एवढेच नाही तर जे शेतकरी किमान सात वर्षांच्या भाडेतत्त्वावर शेती करत आहेत आणि जे कंत्राटी शेती करतात त्यांनाही सिंचनावर अनुदान मिळू शकते.
आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत अर्ज करताना काही कागदपत्रेही जोडावी लागतात. यामध्ये खालील कागदपत्रांचा समावेश आहे.
शेतकऱ्याचे आधार कार्ड
शेतकरी बँकेच्या पासबुकची प्रत
शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र
शेतकऱ्याच्या वीज बिलाची प्रत
मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला आवश्यक आहे.
येथे अर्ज करा
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनावर अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही जवळच्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधून जिल्हा कृषी अधिकारी / जिल्हा फलोत्पादन अधिकारी यांच्याकडून अधिक माहिती मिळवू शकता.
शेतकर्यांना हवे असल्यास, ते ऑनलाइन माध्यमातून देखील अर्ज करू शकतात. यासाठी तुम्ही आवश्यक कागदपत्रांच्या प्रती घेऊन जवळच्या सीएससी केंद्रावर अर्ज करू शकता.
अधिक तपशीलांसाठी योजनेच्या https://pmksy.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.