Farmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणून संपूर्ण जगात विख्यात आहे. मात्र असले तरी शेतीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची (Farmer) आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही.
यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या अनुषंगाने मायबाप शासन (Government) कायमच वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Agriculture Scheme) कार्यान्वित करत असते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जावेत असे त्यांना शेती (Farming) करताना सोयीचे व्हावे या अनुषंगाने सरकार सातत्याने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणते.
2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण भारतवर्षात अनेक योजना राबवल्या आहेत. अशाच दोन शेतकरी हिताच्या योजना आहेत पीएम किसान मानधन योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील एक शेतकरी हिताची योजना आहे.
या दोन्ही योजनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतात. किसान मानधन योजनेंतर्गत वयोवृद्ध शेतकऱ्यांना वर्षभरात 36 हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जातात. त्याच वेळी, किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देते. अशा प्रकारे दोन्ही योजना एकत्र करून एकूण 42 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. अशा पद्धतीने या दोन योजनांचा लाभ घेऊन शेतकरी बांधव वार्षिक 42 हजार रुपये प्राप्त करू शकणार आहेत.
पीएम मानधन योजना नेमकी आहे तरी कशी
मित्रांनो संपूर्ण भारत वर्षातील 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पीएम मानधन योजनेचा लाभ मिळतो. पी एम किसान मानधन योजना याचा लाभ घेण्यासाठी देशातील शेतकरी बांधवांना काही ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून गुंतवणूक करावी लागते. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या भाग घेऊ शकतात. मित्रांनो जर एखादा शेतकरी बांधव 18 वर्षांचे असतील तर त्यांना दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. तसेच जर एखाद्या शेतकऱ्याचे वय 40 वर्ष असेल तर अशा शेतकऱ्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. वयाच्या 60 व्या वर्षी, योजनेत गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन म्हणून हस्तांतरित केले जातील म्हणजे अशा शेतकऱ्यांना 36 हजार रुपये वार्षिक भेटणार आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजना नेमकी आहे तरी कशी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल सांगायचे झाले तर, ही एक मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाचा एक हफ्ता अशा पद्धतीने वार्षिक तीन हप्ते दिले जातात. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात शेतकरी बांधवांना सहा हजार रुपयांचा लाभ होतो. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगतो की, आतापर्यंत सरकारने एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांना वर्ग केले आहेत. आता देशातील तमाम पात्र शेतकरी बांधव 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. असे मानले जाते की, ही रक्कम ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला हस्तांतरित केली जाऊ शकते. निश्चितच या दोन्ही योजनांचा शेतकरी बांधवांनी लाभ घेतला तर त्यांना 42 हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत.