Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सातत्याने विविध योजनांची घोषणा केली जात असते. शासनाकडून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. कापूस, सोयाबीनसहित इतर तेलबिया पिकांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठीही अनेक योजना शासन राबवत आहे.
खरे तर आपल्या देशात कापसाचे आणि सोयाबीनचे क्षेत्र खूपच अधिक आहे. राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. यासोबतच सोयाबीनची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात होते.सोयाबीन हे मध्य महाराष्ट्रातही उत्पादित केले जात आहे.
अशा परिस्थितीत शासनाच्या माध्यमातून कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवली जात आहे.
विशेष म्हणजे ही एक राज्य पुरस्कृत योजना आहे आणि ही लिमिटेड टाईम साठी सुरू झालेली स्कीम आहे. ही योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हणजे हे या योजनेचे शेवटचे वर्ष आहे.
दरम्यान आता याच योजनेसंदर्भात एक मोठी बातमी हाती आली आहे. खरं तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड पंप 100% अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. दरम्यान आता यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
इच्छुक शेतकऱ्यांना आता 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता आपण बॅटरी ऑपरेटेड पंपासाठी अर्ज कसा करायचा याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा करायचा अर्ज ?
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in ही शासनाची महाडीबीटीची अधिकृत वेबसाईट आहे. यानंतर शेतकऱ्याला या वेबसाईटवर आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन घ्यायचे आहे.
यानंतर अर्ज करा यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर कृषी यांत्रिकीकरणमध्ये जायचे आहे. मग मुख्य घटक मध्ये जाऊन तपशीलवर क्लिक करून मनुष्यचलित औजारे घटक निवडायचा आहे.
मग यंत्र / औजारे व उपकरणे – पिक संरक्षण औजारे या बाबीमध्ये जाऊन बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन) ही बाब निवडायची आहे. यानंतर हा अर्ज जतन करायचा आहे. अशा तऱ्हेने तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकणार आहात.