Farmer scheme : देशातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र शासनाकडून कायमच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात. या योजना प्रामुख्याने शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कणा वाकू नये यासाठी सुरू होतात. आतापर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी योजना सुरू झाल्या आहेत.
यामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक योजना चालू करण्यात आल्या आहेत. पी एम किसान ही देखील अशीच एक स्कीम आहे. याची सुरुवात 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 13 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने 13 हप्ते देण्यात आले आहेत.
हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांना लवकरच मिळणार 11व्या वंदे भारत ची भेट! ‘या’ रूटवर धावणार, पहा संपूर्ण रूटमॅप
म्हणजेच ज्या शेतकऱ्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला असेल त्या शेतकऱ्याला सव्वीस हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. 27 फेब्रुवारी रोजी याचा तेरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांना देऊ करण्यात आला आहे. मात्र अजूनही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना हा तेरावा हप्ता मिळालेला नाही. जर अशा शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यथायोग्य माहिती भरलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याचे काही कारण नाही.
कारण की या योजनेअंतर्गत अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पी एम किसानच्या हप्त्याचा लाभ देऊ केला जाणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून या योजनेची नोंदणी करताना आपला बँक खाते क्रमांक किंवा इतर आवश्यक माहिती चुकीची भरली गेली असेल तरी देखील या योजनेचा हप्ता अटकू शकतो.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ! कोस्टल रोड प्रकल्प लांबण्याची शक्यता; ‘या’ वेळी पूर्ण होणार काम, वाचा सविस्तर
यामुळे जर शेतकऱ्यांनी अशी काही चूक केली असेल तर याची माहिती घेण्यासाठी सर्वप्रथम पी एम किसान च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन चुकीची माहिती इंटर झाली आहे की काय याची खातर जमा करावी. आणि माहिती लगेचच दुरुस्त करून घ्यावी.
ज्या शेतकरी बांधवांचे या योजनेचे दोन हप्ते अटकले असतील अशा शेतकऱ्यांनी माहितीची दुरुस्ती केल्यानंतर दोन्ही हफ्त्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचा बारावा आणि तेरावा हप्ता चुकीच्या माहितीमुळे किंवा बँक खाते क्रमांक चुकीचा असल्यामुळे थांबलेले असतील अशा शेतकऱ्यांना या दोन्ही हप्त्यांचे मिळून चार हजार रुपये दिले जाणार असल्याच्या दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी काय आहे?, राज्यातील कोणत्या अन किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ? वाचा सविस्तर