Farmer Scheme : देशातील शेतकऱ्यांना (Farmer) शेतीचे उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार (Government) बांबू लागवडीला प्रोत्साहन देत आहे.
यासाठी शासनाकडून अनेक योजना देखील राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी (Bamboo Farming) प्रोत्साहन देण्यासाठी योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जात आहे. मध्य प्रदेश सरकारने बांबू (Bamboo Crop) लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी आणि बचत गटांना अनुदान देण्यासाठी एक योजना आणली आहे, जेणेकरून अधिकाधिक शेतकरी कमी खर्चात त्यात सामील होऊ शकतील आणि त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील.
बांबू लागवड ही राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. बांबूची रोपे लावली की, दरवर्षी खते, सिंचन, नांगरणी, पाणी यावरील खर्चातून शेतकऱ्याला दिलासा मिळतो. लागवडीपासून 5 वर्षांपर्यंत, शेतकरी आंतरपीक पद्धतीने आपली सामान्य शेती करू शकतो आणि बांबूची कापणी होईपर्यंत शेतकऱ्याच्या उत्पादनाचे कोणतेही नुकसान होत नाही. फर्निचर, सजावटीचे साहित्य, बांधकाम, कृषी क्षेत्र, कागद उद्योग आदींमध्ये बांबूची मागणी सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळणार आहे.
शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाते
मध्य प्रदेश राज्य बांबू मिशनने बांबूचे रोप खरेदी करण्यापासून बांबूची लागवड आणि ते वाढेपर्यंत त्याच्या संरक्षणापर्यंत 240 रुपये खर्चाचा अंदाज लावला आहे. शेतकऱ्याने त्याच्या खाजगी जमिनीवर बांबूची लागवड केल्यास एकूण खर्चाच्या 50 टक्के म्हणजे प्रति रोप 120 रुपये शेतकऱ्यांना अनुदान म्हणून दिले जातील. देवास जिल्ह्यातील देवास, सोनकच्छ, टोणकखुर्द, बागली, कन्नड आणि खाटेगाव या विकास गटातील 448 शेतकऱ्यांनी 541 हेक्टर जमिनीवर 2 लाख 16 हजार 281 बांबूची लागवड केली आहे.
बचत गटांना किती अनुदान दिले जाते
मनरेगा योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील वनक्षेत्रात बचत गटांच्या मदतीने बांबू लागवड करण्यात आली आहे. योजनेंतर्गत 19 ठिकाणी 325 हेक्टर जमिनीवर 2 लाख 3 हजार 125 बांबूची लागवड करण्यात आली आहे. वृक्षारोपण आणि त्याच्या संरक्षणाचा संपूर्ण खर्च मनरेगा योजनेंतर्गत केला जाणार आहे.
पाच वर्षानंतर, बांबू कापणीतून मिळणारे उत्पन्न 20:80 च्या प्रमाणात त्या भागातील ग्राम वन समिती आणि संबंधित बचत गट यांच्यात वाटून घेतले जाईल. तसेच देवास येथील बांबू कारखाना असलेल्या स्वयंसहाय्यता गट आणि आर्टिसन ऍग्रोटेक लिमिटेड यांच्यात बांबू विक्रीचा करार करण्यात आला आहे.
देवास जिल्ह्यात केंपा योजनेत जिल्ह्यातील वनविभागातील सर्व एन्क्लेव्हमध्ये 22 ठिकाणी 595 हेक्टर जमिनीवर 2 लाख 38 हजार बांबूची लागवड करण्यात आली आहे. देवास येथील आर्टिसन अॅग्रोटेक बांबू कारखान्याकडून शेतकरी आणि बचत गटांचा सामंजस्य कराराद्वारे खरेदी आणि विक्रीसाठी बाजारपेठ देखील उपलब्ध आहे. सन 2023-24 मध्ये संपूर्ण जिल्ह्यात विविध योजनांमध्ये शासनाकडून अधिकाधिक बांबू लागवडीचे उद्दिष्ट गाठून तयारी सुरू करण्यात आली आहे.