Farmer Scheme : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहुन अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. परिणामी शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत.
अशीच एक योजना आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. या योजनेअंतर्गत मागेल त्याला शेततळे उपक्रमा अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदान दिले जात आहे.
दरम्यान याच योजनेबाबत नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागेल त्याला शेततळे या घटकासाठी राज्य शासनाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
विशेष म्हणजे, आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र ठरलेल्या 7316 शेतकऱ्यांना 50.81 कोटी रुपयांचे अनुदान देखील वितरित करण्यात आले आहे.
एवढेच नाही तर १६६५ शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान वितरित करण्याचे कारवाई सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान या योजनेसाठी राज्य शासनाने आणखी काही निधी उपलब्ध करून दिला आहे.
राज्य शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी शासनाने आणखी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून यामुळे हजारो शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्यांसाठी अनुदान उपलब्ध होणार आहे.
कसे आहे योजनेचे स्वरूप ?
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शेततळ्याच्या खोदकामासाठी आणि अस्तरीकरणासाठी अनुदान दिले जात आहे. या अंतर्गत शेत तळ्याच्या खोदकामासाठी शेतकऱ्यांना 75 हजार रुपयांचे अनुदान पुरवले जात असून अस्तरीकरणासाठी देखील 75 हजाराचे अनुदान देण्याची तरतूद या योजनेत आहे.
अर्थातच वैयक्तिक शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना एक लाख 50 हजार पर्यंतचे अनुदान या योजनेअंतर्गत मिळू शकते.
या योजनेच्या अंमलबजावणी बाबत बोलायचं झालं तर या योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलवरुन करण्यात येत आहे.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला पाहिजे असे महत्त्वाचे आव्हान यावेळी करण्यात आहे.