Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.
यातील पीएम किसान अंतर्गत वार्षिक 6000 आणि नमो शेतकरी अंतर्गत वार्षिक 6000 असे एका वर्षात 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहेत. दरम्यान याच दोन्ही शेतकरी हिताच्या योजनांचा लाभ येत्या पाच ऑक्टोबरला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
पाच ऑक्टोबर 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान चा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी चा पाचवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार अशी माहिती सरकारने दिली आहे.
म्हणजेच या दिवशी महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान चे 2000 आणि नमो शेतकरी चे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये जमा होणार आहेत.
यासाठी वाशिम येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाशीम येथील याच भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 जमा करणार आहेत.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार अशी माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित राहतील.
कशी आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना?
पी एम किसान योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजाराचा लाभ मिळतो. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण होते. म्हणजेच एका वर्षात तीन हप्ते दिले जातात.
यानुसार आत्तापर्यंत 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अठरावा हप्ता आता उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेच स्वरूप पीएम किसान प्रमाणेच असून पीएम किसानच्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी चा लाभ मिळत आहे.
नमो शेतकरी अंतर्गत आतापर्यंत चार हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आता उद्या या योजनेचा पाचवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.