Farmer Scheme : नवीन वर्ष सुरु होण्याआधीच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने देशातील शेतकऱ्यांना दिलासा देत नुकताच एक मोठा निर्णय घेतला. आरबीआय ने तारणमुक्त कर्जाची मर्यादा वाढवलेली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी आरबीआय कडून तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
सध्या स्थितीला आरबीआय कडून 1.60 लाख रुपयांचे तारण मुक्त कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. मात्र या रकमेत वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर आता आरबीआयने एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता दोन लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज मिळणार आहे. अर्थातच तारण मुक्त कर्ज योजनेची कर्ज मर्यादा चाळीस हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना काहीही तारण ठेवता म्हणजेच गहाण न ठेवता दोन लाख रुपयांचे कर्ज आता मिळू शकणार आहे.
RBI चा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. किसान क्रेडिट कार्ड धारकांना या अंतर्गत आता दोन लाख रुपयांचे विनातारण कर्ज मिळणार असून या निर्णयामुळे किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या देखील आता वाढणार अशी आशा आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
दरम्यान RBI ने घेतलेला हा नवा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून लागू राहणार आहे. म्हणजेच आता देशातील शेतकऱ्यांना नवीन वर्षात दोन लाख रुपयांचे कर्ज विनातारण उपलब्ध होणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या निर्णयामुळे नक्कीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार यात शंकाच नाही.
वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. दुसरीकडे, नवीन वर्षात कर्जदारांना आनंदवार्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण नवीन वर्षात आरबीआय आणखी एक मोठा निर्णय घेणार आहे.
आता व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय आरबीआयकडून घेतला जाईल अशी शक्यता आहे. RBI ने सलग अकराव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही. पण बाराव्या वेळी आरबीआय रेपो रेटमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
रेपो रेट मध्ये जेव्हा कपात होते तेव्हा व्याजदरात कपात होते. तज्ज्ञांच्या मते, आता हाच व्याजदर कपातीचा निर्णय 2025 च्या सुरुवातीला होणार आहे. त्यामुळे देशातील सर्व कर्जदारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.