Farmer Scheme : भारतात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालन व्यवसायात गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा विविध जनावरांचे संगोपन केले जाते.
एवढेच नाही तर उंट, गाढव, घोडा, खेचर अशा जनावरांचे देखील आता मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाऊ लागले आहे. विशेष म्हणजे शासनाच्या माध्यमातून पशुपालन व्यवसायासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
पशुपालनातून पशुपालक व्यावसायिकांना चांगली कमाई करता यावी यासाठी शासनाने आतापर्यंत शेकडो योजना सुरू केले आहेत. दरम्यान आज आपण अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची माहिती पाहणार आहोत. खरे तर या योजनेत शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची सुधारणा केली आहे.
या सुधारणेनुसार आता घोडा, गाढव, उंट, खच्चर या पशुपालनाशी संबंधित व्यवसाय सुरू करणाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता या योजनेअंतर्गत केंद्र सरकार घोडे, गाढव आणि उंटांसाठी वीर्य केंद्र आणि प्रजनन फार्म उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देणार आहे.
या कामासाठी व्यावसायिकांना आता तब्बल दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. एवढेच नाही तर यावर अनुदान देण्याचे देखील प्रावधान यामध्ये करून देण्यात आले आहे.
यासाठी शासनाच्या माध्यमातून तब्बल 50% पर्यंतचे अनुदान मिळणार आहे. दरम्यान या योजनेचा लाभ हा व्यक्ती, शेतकरी उत्पादक संघटना (FPOs), बचतगट (SHGs) आणि कलम 8 कंपन्यांना मिळणार असून या संबंधित लोकांना 50% पर्यंतची सबसिडी दिली जाणार आहे.
एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून घोडे, गाढवे आणि उंटांच्या जातीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारला सुद्धा मदत केली जाणार आहे. यामुळे उंट, गाढव, घोडा यांचे संगोपन वाढणार आहे.
या योजनेतून केंद्र सरकार घोडे, गाढव आणि उंटांसाठी वीर्य केंद्र आणि प्रजनन फार्म उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणार असल्याने शेतीशी निगडित हा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.