Falbag Lagwad Yojana : मित्रांनो गेल्या काही दशकांपासून भारत वर्षात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेष म्हणजे उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शेतकरी बांधव (Farmer) देखील मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत असतात.
मात्र असे असले तरी फळबाग लागवड करणे एवढे पण सोपे काम नाही. फळबाग लागवड करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च शेतकरी बांधवांना करावा लागतो. यामुळे फळबाग लागवड जरी शाश्वत उत्पन्न (Farmer Income) देत असेल तरीदेखील शेतकरी बांधवांना लाखोंचा खर्च करावा लागतो यामुळे अजूनही आपल्या राज्यात बहुतांशी शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीने शेती (Farming) करण्यास अधिक प्राधान्य देतात.
हीच बाब लक्षात घेऊन शासनाने (State Government) शेतकरी बांधवांच्या उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीस प्रोत्साहन देणे हेतू एक कल्याणकारी योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करता यावी यासाठी अनुदान देखील देण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे आता शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करण्यासाठी तब्बल शंभर टक्के अनुदान (Subsidy) मिळणार आहे.
यामुळे निश्चितच राज्यात फळबाग लागवडीला चालना मिळणार आहे. आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ आवळा, कागदी लिंबू व मोसंबी या फळबाग पिकांची लागवड करण्यासाठी मायबाप शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान (Anudan) मिळणार आहे. एवढेच नाही तर ठिबक सिंचन प्रणाली विकसित करण्यासाठी देखील महाराष्ट्र शासनाकडून (Maharashtra Government) अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून मिळत फळबाग लागवडीसाठी अनुदान
मित्रांनो राज्यात फळबाग लागवडीला चालना मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Yojana) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करण्यासाठी तब्बल शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान शेतकरी बांधवांना एकूण तीन टप्प्यात मिळत असतं. 50 टक्के मग 30 टक्के आणि मग 20 टक्के अशा पद्धतीने या योजने अंतर्गत मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त होत.
म्हणजे शेतकरी बांधवांना लागवड केलेली फळबाग यथायोग्य पद्धतीने जोपासावी लागते. फळबागेचे संवर्धन यथायोग्य पद्धतीने केल्यास या योजनेअंतर्गत पूर्ण अनुदान मिळू शकतं. फळबाग लागवड करण्यासाठी आवश्यक कलम किंवा रोपे कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, नामांकित खासगी व कृषि विभागाच्या परवाना धारक रोपवाटीकांमधून खरेदी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
या योजनेअंतर्गत इतका मिळतो लाभ
मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेच्या माध्यमातून आंबा फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान – १ लाख १ हजार ९७२ रुपये मिळत असते. अंतर ५x५, हेक्टरी झाडे ४०० लावली जातात.
पेरू फळबाग – अंतर ३x२, हेक्टरी झाडे १६६६- अनुदान – २ लाख २ हजार ९० रुपये, अंतर ६x४, हेक्टरी झाडे-२७७, अनुदान- ६३ हजार २५३ रुपये.
संत्रा फळबाग – अंतर ६x३, हेक्टरी झाडे ५५५ – अनुदान – ९९ हजार ७१६ रुपये.
संत्रा, मोसंबी, लिंबू फळबाग – अंतर ६x६, हेक्टरी झाडे २७७- अनुदान – ६२ हजार ५७८ रुपये.
सीताफळ फळबाग – अंतर ५x५, हेक्टरी झाडे ४००- अनुदान – ८३ हजार ६३१ रुपये.
आवळा फळबाग – अंतर ७x७, हेक्टरी झाडे २००- अनुदान – ४९ हजार ७३५ रुपये.
निश्चितच या योजनेच्या माध्यमातून राज्यात फळबाग लागवडीला चालना मिळणार आहे. शेतकरी बांधवांना या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ते आपल्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.