Electric Highway Maharashtra : भारताच्या अर्थव्यवस्थेत आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील रस्ते रेल्वे आणि विमान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार झालेत.
ग्रामीण भागात देखील रस्त्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग केले जात आहे. अशातच आता भारतातील पहिला इलेक्ट्रिक हायवे आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. सध्या जर्मनी आणि स्वीडन या देशात इलेक्ट्रिक हायवे पाहायला मिळतो.
या देशांमध्ये असणारा इलेक्ट्रिक हायवे हा फारच अत्याधुनिक असून तिथे वाहने रस्त्यावर चालत असतानाच चार्ज होतात. दरम्यान आता याच दोन देशांच्या धरतीवर आपल्या महाराष्ट्रात देखील इलेक्ट्रिक हायवे उभारला जाणार आहे. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीडन आणि जर्मनी या देशांच्या धरतीवर आपल्या भारतात देखील इलेक्ट्रिक हायवे तयार होणार असे म्हटले आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग अर्थातच मुंबई दिल्ली महामार्गाची एक लेन ही इलेक्ट्रिक राहणार आहे.
म्हणजे या लेनवर फक्त इलेक्ट्रिक वाहने धावणार आहेत. त्यामुळे हा हायवे इलेक्ट्रिक हायवे म्हणून ओळखला जाणारा असून देशातील हा पहिलाच हायवे राहणार आहे. विशेष बाब अशी की या हायवेवर वाहने धावता धावता आपोआप चार्ज होणार आहेत आणि यामुळे वाहनचालकांची वाहने चार्ज करण्यासाठीची कटकट मिटणार आहे.
वाहनचालकांना या मार्गावर प्रवास करण्यासाठी आपले वाहनचार्ज करणे हेतू चार्जिंग स्टेशनवर थांबावे लागणार नाही तर वाहन धावत असतांना चार्ज होणार आहे. 1386 किमी लांबीच्या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा काही भाग इलेक्ट्रिक एक्सप्रेस वेच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे.
हा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. सध्या या महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून 6 राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे वेळेची बचत होणार असून मुंबई ते दिल्ली दरम्यानचा प्रवास देखील सुपरफास्ट होणार आहे.
भविष्यात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुद्धा खास मार्गिका तयार केली जाणार आहे. या महामार्गावरुन ट्रॉलीबस, ट्रक इत्यादी वाहने धावतील. या महामार्गावर वाहने धावता धावताच चार्ज होणार आहेत.
म्हणजेच या महामार्गावर ट्रेनप्रमाणे विजेवर वाहने धावणार आहेत. 8 लेन एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक लेन इलेक्ट्रिक वाहनांसाठी असणार आहे. सेफ्टीसाठी या इलेक्ट्रिक हाईवेच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर उंचीचे अडथळे उभारण्यात येणार आहेत.