Edible Oil Rate : येत्या काही दिवसांनी दसरा आणि दिवाळीचा मोठा सण येणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांनी आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजणार आहेत. अशातच मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी गोड बातमी समोर येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांचा यंदाचा दिवाळी सण गोड होणार आहे. कारण की खाद्यतेलाच्या किमती कमी होतील असा दावा आता केला जाऊ लागला आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे देशात खाद्यतेल आयात करणे महाग झाले. यामुळे देशातील किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या किमती विक्रमी वाढल्यात. पंधरा लिटरच्या एका डब्या मागे 300 ते 400 रुपयांची वाढ झाली.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले. ऐन सणासुदीच्या हंगामातच तेलाच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांनी शासनाच्या निर्णयावर विरोधात नाराजी देखील व्यक्त केली.
खरे तर दरवर्षी सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढत असते आणि यामुळे पुरवठा विस्कळीत होतो आणि किमती वाढतात. बाजारपेठेच्या समीकरणांनुसार मागणी वाढल्यानंतर वस्तूंची किंमत वाढत असते.
त्यामुळे नेहमीच सणासुदीच्या काळात आपल्याला खाद्यतेलाच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळतात. यंदा तर शासनाने सणासुदीच्या काळात खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.
सरकारने हा निर्णय देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी घेतला होता. खरतर तेलबिया उपाध्यक्ष शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत होते.
याच नुकसानीची दखल घेत केंद्रातील सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढवले. यामुळे सोयाबीन समवेत सर्वच प्रमुख तेलबिया पिकांचे भाव वाढलेत. म्हणून आता सरकार पुन्हा एकदा आपल्या निर्णयावर फेरविचार करणार आणि आयात शुल्कात कपात करणार असा दावा केला जाऊ लागला आहे.
दरम्यान जर सरकारने असा निर्णय घेतला तर यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. तथापि या संदर्भात अजून अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे या संदर्भात सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.