Edible Oil Price Hike : सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. खरंतर राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उद्या अर्थातच 23 नोव्हेंबरला मतमोजणी पूर्ण होणार असून त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुतीचे हे स्पष्ट होणार आहे.
मात्र राज्यात नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी हाती येत आहे. ती म्हणजे खाद्य तेलाचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. खाद्यतेलाच्या भावात वाढ झाली असल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे.
खाद्यतेल ही स्वयंपाक घरातील प्रमुख वस्तू. मीठविना ज्याप्रमाणे कोणतेही पदार्थ अळणी लागतात त्याचप्रमाणे खाद्यतेला शिवाय कोणत्याही पदार्थाला चव येणे शक्य आहे. भारतात खाद्यतेलाचा सर्वाधिक वापर होतो. सणासुदीच्या काळात तर खाद्यतेलाला नेहमीच मोठी मागणी असते.
यामुळे सणासुदीच्या काळात नेहमीच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळते. पण आता सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही खाद्यतेलाच्या किमतीत तेजी पाहायला मिळाली आहे. यामुळे सर्वसामान्य चिंतेत आले आहेत. खाद्यतेलाचे भाव किलोचे भाव लिटरमागे तब्बल 25 ते 30 रुपयांनी वाढले आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा निर्णय घेतला होता. सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करावर २० रुपयांनी वाढ केली होती.
तसेच दोन टक्के सेल्स असे २२ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशांतर्गत तेलबिया पिकांचे बाजार भाव वाढलेत पण याचा विपरीत परिणाम हा खाद्यतेलावर पाहायला मिळाला. खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असल्याने याचा सामना सर्वसामान्य ग्राहकांना करावा लागत आहे.
कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २० टक्के वाढ, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले गेले आहे. ग्राहक खरेदी करत असलेल्या सोयाबीन तेलाचा किरकोळ दर आतापर्यंत ११० रुपये प्रति लिटर होता. तो दर आता १२५ रुपयांच्या घरात गेला आहे.
१५ किलो डब्यामागे सरासरी १५० ते २०० रुपये वाढले आहेत. आता आपण 15 लिटरचा तेलाचा डब्बा आधी कितीला मिळत होता आणि आता कितीला मिळतोय याबाबत माहिती पाहणार आहोत. आधी सूर्यफूल तेलाचा डब्बा 1750 रुपयांना मिळत होता मात्र आता तोच डब्बा 2140 रुपयांना झाला आहे.
सोयाबीन चा डब्बा आधी 1600 रुपयांना मिळत होता आता मात्र 2050 रुपयांना मिळतोय. पामतेलाचा डब्बा देखील आधी 1600 रुपयांना मिळत होता मात्र आता हाच डब्बा 1850 रुपयांना मिळत आहे. अर्थातच सूर्यफूल तेलाचा डब्यात जवळपास चारशे रुपयांची, सोयाबीनच्या डब्यात 450 रुपयांची आणि पाम तेलाच्या डब्यात 250 रुपयांची वाढ झाली आहे.