Duck Farming : देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता शेती (Farming) समवेत शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Business) मोठ्या प्रमाणात करत आहेत. विशेष म्हणजे शेतीपूरक व्यवसायातून शेतकरी बांधवांना चांगली कमाई (Farmer Income) देखील होत आहे.
पशुपालन (Animal Husbandry) हा देखील एक शेती पूरक व्यवसाय असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा याला कणा म्हणतात. सध्या ग्रामीण भागात राहणारे शेतकरी गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या, बदके यांचे संगोपन करून चांगला नफा कमावत आहेत. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना शेतीबरोबरच पशुपालन करण्याचा सल्ला देत आहेत. मायबाप सरकारही देशातील शेतकऱ्यांना असे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
बदक पालन शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर (Duck farming)
मित्रांनो संपूर्ण भारत वर्षातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून कुकूटपालन मोठ्या प्रमाणात करत आहेत. कुकूटपालन समवेतचं अलीकडे शेतकऱ्यांमध्ये बदक पालन हा शेती पूरक व्यवसाय देखील मोठा लोकप्रिय होत आहे. जाणकार लोकांच्या मते, कोंबड्यांऐवजी त्यांचे संगोपन करणे हा अधिक फायदेशीर व्यवसाय मानला जातो.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बदक पालन व्यवसायातून शेतकरी कमी खर्चात चांगले पैसे कमवू शकता. कारण की बदकांच्या आहारासाठी शेतकऱ्यांना फारसा खर्च करावा लागत नाही. तसेच बदकाचे मांस आणि अंडी आरोग्यासाठी फायद्याचे असल्याने याची मागणी बाजारात कायम असते. अशा परिस्थितीत बदक पालन व्यवसाय शेतकऱ्यांना निश्चितच चांगली कमाई करून देणार आहे.
बदक पालन व्यवसायासाठी लोन देखील मिळणार (Duck Farming Loan)
मित्रांनो शेती पूरक व्यवसाय सुरू करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने भांडवलसाठी शेतकऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागते. मात्र बदक पालन सुरु करण्यासाठी शेतकरी बांधवांना आता लोन मिळणार आहे. मित्रांनो आम्ही येथे नमूद करू इच्छितो की, बदक पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी नाबार्डकडून 25 टक्के अनुदान दिले जात आहे.
एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्तींसाठी अनुदानाची (Farmer Subsidy) रक्कम 35 टक्के निश्चित करण्यात आली आहे. बदक पालनासाठी नाबार्डकडून शेतकरी बांधवासाठी कर्जाची देखील सोय करून देण्यात आली आहे. याशिवाय प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत देखील शेतकरी बांधव या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकणार आहेत.
तलावाभोवती करा बदकांचे पालन (Duck Farming Information)
जाणकार लोकाच्या मते, बदक पालन सुरू करण्यासाठी शांत जागा सर्वात योग्य मानली जाते. तलावाच्या सभोवतालची जागा यासाठी अतिशय योग्य असल्याचे सिद्ध होते. जर बदक पालनाच्या ठिकाणी तलाव नसेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार तलावाचे खोदकाम करून घेऊ शकता.
जर तुम्हाला तलाव खोदायचा नसेल, तर तुम्ही टिनशेडभोवती दोन ते तीन फूट खोल आणि रुंद नाला बनवू शकता, ज्यामध्ये बदके पोहू शकतात आणि त्यांचा शारीरिक विकास करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, बदकाची अंडी आणि मांस दोन्ही बाजारात चांगल्या किमतीत विकले जात आहेत. अशा परिस्थितीत बदक पालन व्यवसाय शेतकरी बांधवांना चांगला पैसा कमवून देणार आहे.