Drone Subsidy : केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये कृषी ड्रोन अनुदान योजनेचा देखील समावेश होता. राज्यातही ही योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या योजनेअंतर्गत अद्याप एकाही लाभार्थ्याला राज्यात लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कृषी पदवीधर आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ड्रोन खरेदीसाठी प्रत्येक्ष अनुदान केव्हा वितरित होते याकडे लक्ष लागून होते.
मात्र आता कृषी आयुक्तालयाकडून राज्यासाठी एकूण 38 ड्रोन अनुदानास मंजुरी देण्यात आली असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यासाठी एक कोटी 65 लाख रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे. निश्चितच यामुळे ड्रोनच्या वापराला चालना मिळेल आणि शेतकरी बांधवांचा फायदा होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
योजनेचे स्वरूप थोडक्यात
या योजनेअंतर्गत केव्हीके, कृषी विद्यापीठे, ‘आयसीएआर’ची केंद्रे, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्थांना केंद्र शासनाकडून 100 टक्के म्हणजे दहा लाखांपर्यंत अनुदान मिळण्याचे प्रावधान आहे.
यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनेअंतर्गत ड्रोन खरेदी अनुदान म्हणून चार लाख रुपये देण्याचे प्रावधान आहे. यासोबतच कृषी पदवीधारकांना भाडेतत्त्वावर केंद्र उभारणीसाठी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.
या योजनेअंतर्गत साधारण शेतकऱ्यांना मात्र चार लाख रुपये अनुदान दिले जात. मात्र जे शेतकरी बांधव एस सी, एस टी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांना पाच लाख पर्यंतचे अनुदान देण्याचे प्रावधान या योजनेत आहे.
हे पण वाचा : मोठी बातमी ! कांदा उत्पादकांना क्विंटलमागे मिळणार ‘इतकं’ अनुदान; ‘या’ दिवशी जाहीर होणार अनुदान, वाचा सविस्तर
राज्यातील या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळणार ड्रोन अनुदान
- अहमदनगर २ ड्रोन
- रत्नागिरी १ ड्रोन
- सिंधुदुर्ग १ ड्रोन
- नाशिक २ ड्रोन
- धुळे १ ड्रोन
- नंदुरबार १,
- जळगाव २,
- सोलापूर २,
- पुणे २,
- सातारा २,
- कोल्हापूर १,
- सांगली १,
- छत्रपती संभाजीनगर २,
- जालना १,
- बीड २,
- लातूर १,
- उस्मानाबाद १,
- नांदेड २,
- परभणी २,
- हिंगोली १,
- बुलडाणा १,
- वाशीम १,
- अकोला १,
- अमरावती १,
- यवतमाळ १,
- वर्धा १,
- नागपूर १
- चंद्रपूर १