Dragon Fruit Farming : अनेक दिवसांपासून ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit Crop) चर्चा आहे. भारतात त्याची लागवड फार कमी वेळात लोकप्रिय झाली आहे. ड्रॅगन फ्रूटच्या नावावरूनच हे एक विदेशी फळ आहे असं समजलंच असेल. हे फळ रसाळ आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
ड्रॅगन फ्रूट हे शेतकऱ्यांना (Farmer) अधिक नफा (Farmer Income) देणारे पीक आहे. भारतातील अनेक राज्यांतील प्रगतीशील शेतकऱ्यांनी (Progressive Farmer) ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरू केली आहे. आपल्या राज्यात देखील या फळाची आता शेती होऊ लागली आहे. पण फार कमी शेतकऱ्यांना त्याची लागवड माहीत आहे. अशा परिस्थितीत आज आपण ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.
ड्रॅगन फ्रूट हे एक रसाळ, गोड फळ आहे जे दिसायला गुलाबी असते परंतु जातीनुसार ते वेगवेगळ्या रंगाचे असू शकते. ड्रॅगन फ्रूटचे शास्त्रीय नाव हायलोसेरियस अंडॅटस आहे. त्याची वनस्पती नागफणीसारखी असते. बाजारात हे फळ 600 ते 800 रुपये किलो दराने (Dragon Fruit Rate) विकले जाते. थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल आणि श्रीलंकामध्ये ड्रॅगन फ्रूट खूप लोकप्रिय आहे. तेथे त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
तेथील बाजारात चांगल्या भावात विकून शेतकरी लाखो कमावतात. या फळाला मागणी आणि किमतीमुळे भारतातील शेतकरी देखील या फळाचा व्यवसाय म्हणून अवलंब करत आहेत आणि चांगला नफा मिळवत आहेत. ड्रॅगन फ्रूटपासून जॅम, आइस्क्रीम, जेली, ज्यूस आणि वाईन बनवतात. ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येते. याच्या फळातील बिया किवी सारख्या मुबलक प्रमाणात आढळतात.
ड्रॅगन फ्रुट शेती साठी आवश्यक हवामान
ड्रॅगन फ्रूट ही ओलसर आणि उबदार हवामानाची वनस्पती आहे. भारतात असं हवामान आहे यामुळे यांची भारतात लागवड सहज शक्य आहे. जास्त हिमवर्षाव असलेल्या भागात त्याची लागवड करता येत नाही. तापमानाबद्दल बोलायचे झाले तर, कमाल 40 अंश सेल्सिअस आणि किमान 10 अंश सेल्सिअस या वनस्पतीसाठी फायदेशीर आहे.
ड्रॅगन फ्रुट शेती साठी आवश्यक जमीन
ड्रॅगन फ्रूट साधारण 7-8 पीएच मूल्य असलेल्या जमिनीत लावले जाऊ शकते. यासाठी सर्व प्रकारच्या सुपीक माती योग्य आहेत. पाणी साचलेल्या भागात त्याची लागवड करू नये. जिथे लागवड केली जाते तिथे पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी.
हे फळ भारतात नवीन आहे, त्यामुळे शेतकर्यांना त्याच्या लागवडीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ड्रॅगन फ्रूट रोपांची लागवड बियाणे आणि वनस्पती दोन्ही स्वरूपात केली जाते. कलम पद्धतीने त्याची रोपे लावणे चांगले. कटिंगच्या स्वरूपात लागवड केल्यावर रोप 2 वर्षांनी उत्पन्न देऊ लागते. तर बियाण्यापासून लागवड करण्यास 4-5 वर्षे लागतात. जेव्हा तुम्ही कटिंग्ज किंवा बिया खरेदी करता तेव्हा फक्त प्रमाणित किंवा विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करा. नेहमी नोंदणीकृत नर्सरीमधून खरेदी करा.
या फळाच्या लागवडीला जास्त पाणी लागत नाही. ड्रॅगन फ्रूटची लागवड कमी पाण्यातही सहज करता येते. हिवाळ्यात या झाडाला महिन्यातून दोनदा तर उन्हाळ्यात 8-12 दिवस पाणी द्यावे लागते.
खतांबद्दल बोलायचे झाले तर ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी सेंद्रिय खत सर्वोत्तम असते. यामध्ये 10 ते 15 किलो शेणखत आणि 50 ते 70 ग्रॅम एन.पी.के. रोपे लावण्यापूर्वी तयार केलेल्या खड्ड्यात भरून झाडाला पाणी द्यावे.
ड्रॅगन फ्रुट शेती साठी अपेक्षित उत्पादन खर्च आणि उत्पन्न
या ड्रॅगन पिकासाठी एकदाच भांडवल लागते, असे कृषी शास्त्रज्ञ सांगतात. पारंपारिक शेतीच्या तुलनेत 25 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. किंमतीबद्दल बोलायचे तर, त्याची वनस्पती निवडुंगासारखी आहे. फळधारणेसाठी झाडांना आधार आवश्यक असतो. त्याची रचना उभारण्यासाठी एकरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. एक एकरात 10 फूट अंतरावर खांब उभारून झाडे लावली जातात. एकरी सुमारे 1700 रोपे लागतात. एकदा मोठी रक्कम खर्च केली की, त्याच रचनेवर 25 वर्षे उत्पन्न मिळते.