Dalimb Bajar Bhav : डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (farmer) यंदाची दिवाळी निश्चितच अच्छे दिन आणणारी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाला (Pomegranate Crop) कधी नव्हे तो उच्चांकी बाजार भाव मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांची (Pomegranate Grower Farmer) दिवाळी गोड झाली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की महाराष्ट्रात डाळिंब लागवडीखालील (Pomegranate Farming) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने राज्यातील शेतकरी बांधवांनी डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, दिवसेंदिवस डाळिंबाच्या उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने डाळिंब लागवड शेतकरी बांधवांसाठी तोट्याचा सौदा सिद्ध होत होत आहे.
मात्र यावर्षी डाळिंबाला चांगला उच्चांकी बाजार भाव (Pomegranate Rate) मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे झळकत आहेत. मित्रांनो काल पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला या हंगामातील सर्वोच्च दराची नोंद करण्यात आली आहे. काल पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 751 क्विंटल भगव्या डाळिंबाची आवक झाली होती. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये डाळिंबाला 17 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल अर्थातच 171 रुपये किलो एवढा बाजार भाव मिळाला आहे.
निश्चितच डाळिंबाला विक्रमी बाजार भाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळत आहे. सोयाबीन कापूस या खरीप हंगामातील मुख्य पीक कांदा बाजारात अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत असताना डाळिंब पिकाला मिळत असलेला बाजार भाव शेतकऱ्यांसाठी दिलासादायक सिद्ध होत आहे.
दरम्यान, डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते, डाळिंब पिकासाठी दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत असल्याने तसेच डाळिंब बागेत मर रोगाचे प्रमाण आणि तेलकट रोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने डाळिंब पिकासाठी सध्या मिळत असलेला बाजार भाव कायम राहणे आवश्यक आहे.
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
20/10/2022 | ||||||
अमरावती- फळ आणि भाजीपाला | — | क्विंटल | 40 | 8000 | 10000 | 9000 |
औरंगाबाद | — | क्विंटल | 27 | 1000 | 8200 | 4600 |
मुंबई – फ्रुट मार्केट | — | क्विंटल | 524 | 9000 | 13000 | 11000 |
श्रीरामपूर | — | क्विंटल | 32 | 1500 | 4000 | 2750 |
पिंपळगाव बसवंत | — | क्विंटल | 62 | 250 | 13550 | 8400 |
पंढरपूर | भगवा | क्विंटल | 751 | 1000 | 17100 | 8000 |
नागपूर | भगवा | क्विंटल | 15 | 2000 | 13000 | 10250 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 9 | 6000 | 7000 | 6500 |
नाशिक | मृदुला | क्विंटल | 841 | 600 | 14000 | 9500 |