Dairy Farming : तुम्हीही नजीकच्या भविष्यात गाय पालन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे. खरे तर, आपल्या देशात शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालनाचा व्यवसाय हा प्रामुख्याने दुधासाठी केला जातो.
दुग्ध उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होते. दुधाच्या व्यवसायासाठी काही शेतकरी गाईचे संगोपन करतात तर काही शेतकरी म्हशीचे संगोपन करतात.
मात्र दुधाच्या व्यवसायात जर यशस्वी व्हायचे असेल तर जनावरांच्या सुधारित जातींची निवड करणे आवश्यक असते. दरम्यान आज आपण गायीच्या अशा एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत जी एका वेतात तब्बल 300 दिवस दूध देते.
ही आहे गाईची सुधारित जात
एका आकडेवारीनुसार भारतात जवळपास 53 पेक्षा अधिक गाईच्या जाती आहेत. यातील काही जाती देशी आहे तर काही जाती विदेशी आहेत. देशी म्हणजेच गावठी गायी विदेशी जातींच्या तुलनेत दूध उत्पादनात थोड्याशा कमकुवत असतात.
मात्र, देशी गाई भारतातील सर्व प्रकारच्या हवामानात तग धरण्यास सक्षम आहेत. भारतात आढळणाऱ्या बहुतांशी विदेशी गायीच्या जाती सर्वच प्रकारच्या वातावरणात तग धरून राहत नाहीत.
पण आपल्या देशात अशाही काही विदेशी गायी आहेत ज्या की सर्व प्रकारच्या वातावरणात तग धरून राहतात आणि चांगले दूध उत्पादन देतात. आज आपण अशाच एका गाईची माहिती पाहणार आहोत.
आज आपण ज्या गायीची माहिती पाहणार आहोत ती आहे फ्रिजवाल जातीची गाय. गाईची ही एक विदेशी जात आहे. या जातीचे विदेशात मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. विशेष म्हणजे आपल्या भारतातही या जातीच्या गाई पाळल्या जातात.
आपल्या देशाचे हवामान या जातीच्या गाईसाठी विशेष अनुकूल असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. ही गाय दूध उत्पादनासाठी विशेष ओळखली जाते आणि या जातीची रोगप्रतिकारक क्षमता देखील इतर जातींच्या तुलनेत चांगली असल्याचे आढळले आहे.
हेच कारण आहे की डेरी फार्मिंग चा व्यवसाय करणारे बहुतांशी शेतकरी बांधव या जातीच्या गायीचे संगोपन करत आहेत. जर तुम्हीही आगामी काळात दुधाचा धंदा सुरू करणार असाल तर तुमच्यासाठी या जातीच्या गायीचे संगोपन फायदेशीर ठरणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीची गाय एका वेतात तब्बल 300 दिवस दूध देते. विशेष म्हणजे या जातीची दैनंदिन दूध उत्पादन क्षमता ही इतर जातींच्या तुलनेत अधिक आहे.
तज्ञांनी ही गाय एका वेतात तब्बल 4000 लिटर दूध देण्यास सक्षम असल्याचा मोठा दावा केला आहे. अर्थातच ही गाय दररोज 12 ते 13 लिटर दूध देण्यास सक्षम आहे.