Dairy Farming : भारतात पशुपालन (Animal Husbandry) फार पूर्वीपासून केले जात आहे. असे सांगितले जाते की अगदी शेती (Farming) व्यवसायाच्या सुरूवातीपासून आपल्या देशात पशुपालन केले जात आहे. पशुपालन मुख्यता दुग्ध व्यवसायासाठी (Milk Production) केले जाते.
अशा परिस्थितीत दुधारू जनावरांची खरेदी करताना पशुपालक शेतकरी बांधवांना (Livestock Farmer) अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. दुग्धजन्य जनावरांची खरेदी-विक्री हे पशुपालन व्यवसायातील एक मोठे काम आहे. यामुळे जनावरांची खरेदी विक्री करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. खरं पाहता जनावरांना शेतकऱ्यांचे (Farmer) ठेवी भांडवल म्हटले जाते.
यामुळे दुधारू जनावरांची खरेदी करतांना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी आज आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पशुपालकांनी काही गोष्टींची काळजी घेऊन दुभत्या जनावरांची खरेदी केल्यास त्यांना दुग्धव्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. या उपायांचा अवलंब केल्याने, दुग्धजन्य जनावरांच्या साध्या जातींच्या खरेदी-विक्रीच्या फसवणुकीपासून सावध राहण्यास देखील मदत होते.
निरोगी प्राणी खरेदी करावे
चांगले दूध उत्पादन हे पूर्णपणे जनावरांच्या चांगल्या आरोग्यावर अवलंबून असते, त्यामुळे जनावरांचे आरोग्य आणि त्यांच्या मागील आरोग्य नोंदी तपासूनच जनावरांची खरेदी-विक्री करावी. असा सल्ला जाणकार लोकांकडून पशुपालक शेतकरी बांधवांना दिला जात आहे. केवळ चांगल्या जातीच्या जनावरांनाच जास्त प्रमाणात दूध मिळते असे नाही, तर चांगल्या जातीच्या जनावरांचे आरोग्य इतरांपेक्षा चांगले असते यामुळे या जातीच्या जनावरांपासून चांगले दूध पशुपालक शेतकऱ्यांना मिळत असते. खरं पाहता सुधारित जातींच्या प्राण्यांची प्रतिकारशक्ती नेहमीच मजबूत असते. या प्राण्यांना अन्नामध्ये हिरवा चारा आणि पशु आहार देखील दिला जातो.
जातीची निवड करतांना विशेष काळजी घ्या
दुधाळ जनावर खरेदी करण्यापूर्वी त्या जनावराची जात कोणती आहे, त्याचे गुण काय आहेत आणि या जनावरांना काही त्रास होऊ शकतो का हे लक्षात ठेवावे. याशिवाय जनावर एका वेतात किती दूध देऊ शकते, आदी बाबीही जनावरांच्या विक्रेत्याकडून विचारल्या पाहिजेत.
शरीराची रचना आणि त्वचा पहाण्याचा सल्ला
जाणकार लोक पशुपालक शेतकरी बांधवांना सल्ला देतात की, दुधाळ जनावर खरेदी करताना जनावराची शारीरिक रचना आणि तो कसा उभा राहतो याकडे लक्ष द्यावे. जो प्राणी नीट उभा राहू शकत नाही किंवा अशक्त दिसतो तो विकत घेऊ नये. असे प्राणी कमकुवत असतात आणि त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असते. अशा प्राण्यांना रोग लवकर होतात. याशिवाय लहान पाय आणि तोंड आणि कपाळावर केस असणे हे चांगल्या दुभत्या प्राण्याचे लक्षण आहे. चांगल्या दुभत्या जनावरांचे डोळे स्वच्छ आणि त्वचा गुळगुळीत व पातळ असते. याशिवाय चांगल्या दुभत्या जनावरांना त्यांच्या हावभावावरूनही ओळखता येते.
कासे तपासण्याचा दिला जातो सल्ला
जनावरांच्या निरोगी आणि सुरक्षित कासेवरून किंवा आयनवरून त्यांच्या आरोग्याचा आणि दूध देण्याच्या क्षमतेचाही अंदाज लावता येतो. तज्ज्ञांच्या मते, दुधाच्या शिरांवर फुगवटा किंवा वाकडा आकार असल्यास जनावरांची दूध उत्पादन क्षमताही चांगली राहते. याशिवाय निरोगी दुभत्या जनावरांचे कासे दूध दिल्यानंतर आकसतात. अशी जनावरे दुग्धव्यवसायातील नफा वाढवण्यासाठी विशेष प्रभावी ठरत असल्याचा दावा केला जातो.
दुसरे किंवा तिसरे वेतातील पशु खरेदी करा
पशु तज्ज्ञांच्या मते दुग्धव्यवसायासाठी गाय आणि म्हशीचे दुसरे किंवा तिसरे वेत सर्वोत्तम मानले जाते. अशा जनावरांची दुग्धोत्पादन क्षमता 7 वेतापर्यंत असते. अशा जातींच्या दुभत्या जनावरांपासून पायडू किंवा वासरू तयार होण्याची शक्यता अधिक असते, जी गुरेढोरे मालकांसाठी भविष्यातील भांडवल म्हणून काम करू शकतात.