Dairy Farming Business : भारतात शेतीचा व्यवसाय हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेतीसोबतच शेतीशी निगडित इतरही अनेक छोटे-मोठे व्यवसाय आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. यामुळे आपल्या देशाला शेतीप्रधान देशाचा दर्जा मिळाला आहे. भारतात शेती समवेतच दुग्ध व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.
अलीकडे मात्र शेतकऱ्यांकडून दुधाचा व्यवसाय परवडत नसल्याची तक्रार केली जात आहे. दिवसेंदिवस दुधाचे उत्पादन कमी होत आहे आणि दुधाला मिळत असणारा दर देखील परवडत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जाते.
दरम्यान आज आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गाईच्या तीन अशा जातींची माहिती सांगणार आहोत, ज्याच्या संगोपनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे.
तुम्हालाही दूध किंवा दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी खूपचं उपयुक्त ठरणार आहे. कोणती गाय सर्वात जास्त दूध देते हे जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहे जेणेकरून त्यांना दुग्ध व्यवसायातून चांगला नफा मिळवता येणे शक्य होणार आहे.
दुधाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती
साहिवाल गाय : गाईची एक देशी दात असून याचे पालन देशातील अनेक राज्यांमध्ये केले जाते. ही गायीची एक प्रमुख जात आहे याचे पालन हे प्रामुख्याने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात केले जाते. बिहारमध्ये देखील या जातीचे संगोपन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आपल्या राज्यातही काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी या जातीचे संगोपन केले आहे.
साहिवाल गाय एका दिवसात 20-25 लिटर दूध देते आणि सुमारे 10 महिने दूध देत राहते. दुग्धोत्पादनाच्या उच्च उत्पादनामुळे ही जात डेअरी उद्योगात लोकप्रिय बनली आहे. दुधाचा व्यवसाय सुरू करणार असाल तर या जातीचे संगोपन केले जाऊ शकते.
संकर जात (क्रॉस ब्रीड) : देशात डेन्मार्कमधील हॉलिस्टन फ्रिजियन जातीच्या संकरित गायींची पैदास केली जात आहे. या गायी दिवसाला 30-35 लिटर दूध देतात. या गायींना रोग होण्याची शक्यता कमी असते आणि या जातीचे दूध उत्पादन हे विशेष उल्लेखनीय आहे.
हॉलिस्टन फ्रिजियन : ही गाय डेन्मार्कची आहे. ही विदेशी जात आपल्या भारतातही मोठ्या प्रमाणात पाळली जाते. ती प्रत्येक ठिकाणी सहज पाळता येते. ही गाय दररोज ४० लिटर दूध देते आणि रोगाचा धोका खूप कमी असतो. उच्च दूध क्षमता आणि सहनशीलतेमुळे भारतातील पशुपालक शेतकरी याच्या संगोपनातून चांगली कमाई करत आहेत.