Cyclone Michaung Rain Alert : मागील काही दिवसांपासून राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिक चिंतेत आले आहेत. खरंतर डिसेंबरचा पहिला आठवडा उलटत चालला आहे.
मात्र अजूनही महाराष्ट्रात जोरदार थंडीला सुरुवात झालेली नाही. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून थंडीला सुरुवात होत असते. यंदा मात्र कडाक्याच्या थंडीला अजूनही सुरुवात झालेली नाही.
दिवाळीनंतर थंडीमध्ये वाढ होणार अशी आशा होती मात्र थंडी वाढण्याऐवजी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यासह देशातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी लागली होती.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या महिन्यात पाऊस कोसळला. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला थोडासा पावसाचा जोर मात्र कमी झाला. यामुळे आता हवामान निवडायला आणि कडाक्याचे थंडी पडेल अशी शक्यता होती.
अशातच मात्र बंगालच्या उपसागरात एका नवीन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. मिचौंग चक्रीवादळामुळे राज्यासह देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
या चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. चेन्नईमध्ये पावसाचा हाहाकार पायाला मिळाला आहे. चक्रीवादळामुळे आणि वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी पाहायला मिळाली आहे.
दरम्यान चक्रीवादळाचा धोका आणखी वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह देशातील जवळपास 17 राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्कायमेट या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता येत्या 24 तासात आणखी वाढणार आहे. यामुळे देशातील 17 राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या झारखंडमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारीपट्टी भागातही अतिमुसळधार पाऊस होणार असा अंदाज आहे. याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांवरही धुव्वाधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे.
आपल्या राज्यातही पावसाची शक्यता आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस होणार असे सांगितले गेले आहे. एकंदरीत अवकाळी पावसाचे सावट आगामी काही दिवस असच कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.