Crpf Recruitment 2023 : दहावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी करण्याचा गोल्डन चॅन्स चालून आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने 9 हजार 212 हवालदार (तांत्रिक/ ट्रेड्समॅन) या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
यामुळे ज्या तरुणांना सीआरपीएफ मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही निश्चितच आनंदाची पर्वणी राहणार आहे. दरम्यान आज आपण सीआरपीएफने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या सर्व बाबी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- तरुणांसाठी खुशखबर! मुंबई उच्च न्यायालयात निघाली मेगाभरती; 7वी पास उमेदवारांना देखील अर्ज करता येणार, पहा…..
कोणत्या आणि किती जागांसाठी होतेय भरती
हवालदार (तांत्रिक/ ट्रेड्समॅन) या पदाच्या 9212 रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
अर्ज कसा सादर करायचा
यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://crpf.gov.in/recruitment-details.htm?263/AdvertiseDetail या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.
हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; सलग तिसऱ्या दिवशी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ, आणखी वाढणार का भाव?
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
सीआरपीएफ कडून करण्यात आलेल्या या भरतीसाठी 25 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
पदासाठी शैक्षणिक पात्रता
सीआरपीएफ च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या भरतीसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहे. अर्ज करण्यापूर्वी मात्र उमेदवाराने एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे राहणार आहे.
किती मिळणार पगार
21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना इतकं वेतन मान या पदासाठी राहणार आहे.
जाहिरात कुठे पाहणार
सीआरपीएफने जारी केलेल्या या पदासाठीची अधिकृत अधिसूचना पाहण्यासाठी सीआरपीएफ रिक्रुटमेंट 2023 या लिंक वर क्लिक करा.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! आता मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त, मुंबई मेट्रो जारी करणार पास, पहा कसा राहणार पासचा दर