Crop Management: सध्या देशातीलं शेतकरी बांधव (Farmer) खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांच्या व्यवस्थापनासाठी (Crop Management) लगबग करत असल्याचे चित्र आहे. खरं पाहता कोणत्याही हंगामातील पिकांचे सर्वाधिक नुकसान तणांमुळे (Weed) होते.
पिकात वाढणारे गवत वनस्पतींचे पोषण शोषून घेतात आणि त्यांना कमकुवत करतात आणि कीटक-रोगांनाही (Crop Disease) आमंत्रण देतात. यामुळे पिकांचे उत्पादन 40 टक्क्यांनी कमी होते. शेतात वाढणाऱ्या अशा गवतामध्ये गाजर गवताचा (Carrot Grass Weed) देखील समावेश होतो.
पिके या गवताच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यावर अनेक प्रकारचे रोग येतात. या गवतामुळे फक्त पिकेच नाही तर माणसांचे देखील आरोग्य धोक्यात येऊ लागते. या प्रकारच्या तणांच्या प्रतिबंधासाठी (weed control), कृषी तज्ञांकडून सतत व्यवस्थापन आणि देखरेखीची कामे करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून आपण या तणांचे वेळीच नियंत्रण करू शकू.
गाजर गवतामुळे पिकांचे होणारे नुकसान
फार कमी लोकांना माहिती असेल, परंतु शेतात गाजर गवत वाढल्याने पिकांवर तसेच शेतकऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्याच्या संपर्कात येताच एक्जिमा, ऍलर्जी, ताप आणि दमा यांसारख्या आजारांची शक्यता वाढते.
हे गवत पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता कमी करते. विशेषतः मका, सोयाबीन, वाटाणा, तीळ, एरंड, ऊस, बाजरी, भुईमूग, भाजीपाला यासह अनेक बागायती पिकांमध्ये या गवताचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते. या गवतामुळे पिकाची उगवण होण्यापासून ते झाडांचा विकास होणे कठीण होते.
चारा पिकांवर त्याचा प्रादुर्भाव झाल्याने जनावरांची दूध उत्पादन क्षमताही कमी होऊ लागते. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची चव कडू होऊन जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
अशा पद्धतीने करा गाजर गवताचा प्रतिबंध
गाजर गवताच्या प्रतिबंधासाठी, अनेक कृषी संस्था आणि कृषी शास्त्रज्ञ जनजागृती मोहीम राबवत असतात, जेणेकरून कोणतीही जीवित आणि वित्तहानी होऊ नये. कृषी विज्ञान विभाग, तण संशोधन संचालनालय, जबलपूर आणि चौधरी सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सार या विषयावर शेतकऱ्यांशी सतत माहिती सामायिक करत आहेत.
काही कृषी तज्ज्ञ त्याच्या प्रतिबंधासाठी तणनाशके जसे की सिमागिन, अॅट्राझिन, अॅलाक्लोर, डायरॉन सल्फेट आणि सोडियम क्लोराईड (मीठ) इत्यादींची फवारणी करण्याची शिफारस करतात.
यासाठी जैविक उपाय म्हणून, या गवताला खाणारे बीटल वाढवण्याची शिफारस करत असतात. गाजर गवत प्रति एकर शेतातून 3 ते 4 लाख कीटकांचे संगोपन करून मुळापासून नष्ट केले जाऊ शकते.
तुमची इच्छा असल्यास, तुम्ही कॅशिया तोरा, झेंडू, टेफ्रोसिया पर्प्युरिया, जंगली राजगिरा यांसारख्या वनस्पती वाढवून त्याचा प्रादुर्भाव बर्याच प्रमाणात कमी करू शकता.