Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक अतिशय कामाची आणि काहीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो पिक विमा (Crop Insurance Scheme) संदर्भात एक महत्त्वाच अपडेट हाती आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 2021 मधील खरीप हंगामातील पिक विमा वाटपासाठी मुहूर्त सापडल आहे. मित्रांनो खरं पाहता, 2021 मधील खरीप हंगामातील पीक विम्याची 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना (Farmer) मिळाली होती मात्र 75 टक्के रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली नाहीये.
मित्रांनो एका मीडिया रिपोर्टनुसार, 2021 खरीप पिक विमासाठी 23 जिल्ह्यात अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या आणि तेथील शेतकऱ्यांना पीक विमा साठी पात्र ठरवण्यात आले होते. 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधव पिक विमा साठी पात्र झाल्यानंतर त्यांना 25 टक्के रक्कम त्यावेळी मिळाली होती मात्र उर्वरित 75 टक्के रक्कम अजूनही अशा शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आता 2021 खरीप हंगामातील (Kharif Season) राहिलेला उर्वरित पीक विम्याची रक्कम वाटपास सुरुवात झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो जे शेतकरी बांधव 2021 खरीप पिक विमासाठी पात्र असतील त्यांना मागील वर्षी 25% आगाऊ रक्कम वर्ग करण्यात आली असेल, अशा शेतकऱ्यांची 75 टक्के रक्कम बाकी आहे. यामुळे ही 75 टक्के रक्कम आता सदर शेतकऱ्यांना मिळणार आहे. मित्रांनो उदाहरणासाठी आपण असं समजू एखाद्या शेतकऱ्याला वीस हजार रुपयाचा पिक विमा मंजूर झाला आहे.
मग अशा शेतकऱ्याला त्यावेळी म्हणजेच 2021 मध्ये 25% रक्कम म्हणजे पाच हजार रुपये मिळाले आहेत आणि आता या शेतकऱ्यांना 75 टक्के म्हणजे जवळपास 15 हजार रुपये रक्कम मिळणार आहे. निश्चितच 2021 खरीप पिक विमा संदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पिक विमा काढलेला शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी असून यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. 2022 खरीप पिक विमा संदर्भात देखील काही जिल्ह्यात अधिसूचना जारी करण्यात आल्या असून शेतकऱ्यांना आगाऊ 25 टक्के रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे.