Cow Rearing : भारतात अगदी शेती (Farming) व्यवसायाच्या सुरुवातीपासून शेतीसोबतच पशुपालनही (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. विशेष म्हणजे पशुपालन शेतकरी बांधवांसाठी (Farmer) फायद्याचे ठरत असून त्यांना यातून लाखोंची कमाई होत आहे.
शेतीसोबतच पशुपालनाच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांच्या गरजाही पूर्ण केल्या जातात. मित्रांनो पशुपालनात सर्वाधिक गाईंचे पालन केले जाते. अशा परिस्थितीत गायी पालनाबद्दल बोलायचे झाले तर आजच्या काळात नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने गायी पालनाला खूप प्रोत्साहन दिले जात आहे.
तसेच गाई पालन इतर पशुपालनाच्या तुलनेत सोयीचे असल्याने शेतकरी बांधव गाई पालनाला अधिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. गाईच्या दुधाच्या उत्पादनाव्यतिरिक्त, आता शेण आणि गोमूत्र ची मागणी देखील बाजारात वाढत आहे. मात्र असे असले तरी जाणकार लोक पशुपालक शेतकरी बांधवांना गाईंच्या सुधारित जातीचे (Cow Breed) पालन करण्याचा सल्ला देतात.
आपल्या देशात गायींच्या अशा काही प्रजाती आहेत, ज्या अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहेत. यासोबतच शेतकरी बांधवांचे उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यात देखील गाय पालन भागीदार बनू शकणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण गाईच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण लाल कंधारी गाय (Lal Kandhari Cow) या गायीच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
लाल कंधारी गाय
नावाप्रमाणेच या प्रजातीच्या गायीचा रंग गडद लाल किंवा गडद तपकिरी असतो. लांब कान आणि मध्यम पिसारा असलेली लाल कंधारी गाय दररोज 1.5 ते 4 लिटर दूध देते. त्याचा पहिला बछड्यांचा कालावधी फक्त 30 ते 45 दिवसांचा असतो, त्यानंतर ते वर्षातील 130 ते 190 दिवसांपर्यंत चांगले दूध उत्पादन मिळवू शकते. या गायीची किंमत 40 ते 50 हजार रुपये एवढी असते. जी लहान शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि फायदेशीर ठरू शकते. हे लहान शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर आहे कारण त्याची काळजी घेण्यात जास्त वेळ वाया जात नाही आणि त्याला खायला हिरवा चारा नेहमीच आवश्यक नसतो.
लाल कंधारी गाईचा इतिहास
गाईची ही जात महाराष्ट्रातील कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कंधार तालुक्यातील गाईचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते अशा परिस्थितीत या गाईला लाल कंधारी नाव पडले आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, लाल कंधारी गाय ही एक देशी जात आहे, जी चौथ्या शतकात कंधारच्या राजांच्या देखरेखीखाली विकसित करण्यात आली होती. याला महाराष्ट्र आणि कोकणी भागात लाखलबुंडा असेही म्हणतात. आता अनेक राज्यांमध्ये गायीची मागणी वाढत आहे, ज्यामध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जीवनमानातही भर पडली आहे.