Cow Rearing: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून शेतीसमवेतच शेतीपूरक व्यवसाय (Agri Business) करत आले आहेत. खरं पाहता शेतकरी बांधवांसाठी शेतीपूरक व्यवसाय अतिरिक्त उत्पन्नाच शाश्वतं साधन देखील बनले आहे. शेती पूरक व्यवसायात शेतकरी बांधव प्रामुख्याने पशुपालन (Animal Husbandry) करत असतात.
पशुपालन व्यवसायात गाईचे पालन (Cow Farming) हे आपल्या देशात सर्वाधिक केले जाते. गाय पालन इतर पशुपालनाच्या तुलनेत सोपे असल्याने शिवाय कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देत असल्याने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात गायीचे पालन करत असतात. आज आपण देखील गाई पालन विषयी जाणून घेणार आहोत. वास्तविक आज आपण गाईच्या एका जातीविषयी (Cow Breed) जाणून घेणार आहोत.
आज आपण गाईच्या एका अशा जातीविषयी जाणुन घेणार आहोत जिच्या पालनातुन शेतकरी बांधव अल्प कालावधीतच लाखो रुपयांचे उत्पन्न कमवू शकणार आहेत. आपल्या देशातील पशुपालक शेतकरी वेगवेगळ्या जातीच्या गाईंचे पालन करत असतात. यामध्ये देशी तसेच संकरित गाईंचा समावेश असतो. आज आपण आपल्या एका देशी गोवंशाची (Desi Cow Rearing) माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आम्ही ज्या गाईच्या जाती बद्दल बोलत आहोत ती जातं आहे डांगी. डांगी (Dangi Cow) ही गाईची एक देशी जातं असून या जातीचे देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पालन केले जात असते.
वास्तविक पाहता डांगी ही गाय गुजरात मधील डांग भागात सुरवातीला मोठ्या प्रमाणात पाळली जात असल्याने तिला डांगी असे नाव पडले असावे असा समज आहे. डांगी गाय विशेषता दुग्ध उत्पादनासाठी तसेच शेणखतासाठी मोठ्या प्रमाणात पाळली जात असते. सुरुवातीला या जातीची गाय गुजरातमधील डांग भागात मोठ्या प्रमाणात आढळत असे. मात्र कालांतराने गाईची ही देशी जात देशातील इतर भागात पशुपालक शेतकरी मोठ्या प्रमाणात पाळू लागले.
आपल्या राज्यात देखील डांगी या गाईचे पालन मोठ्या प्रमाणात होत असते. आता आपल्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्राच्या नासिक, अहमदनगर तसेच पश्चिम घाटातील इतर काही जिल्ह्यात या गाईचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाऊ लागले आहे. या गाई ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही गाय आपल्या भारतीय हवामानात सहज तग धरते.
आपल्या राज्यातील हवामान देखील या गाई साठी विशेष अनुकूल असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगत असतात. यामुळे महाराष्ट्रात या गाईंचे पालन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. गाईची ही एक देशी जात असून देखील दुग्ध उत्पादनासाठी चांगली उत्तम असल्याने या गाईचे पालन पशुपालक शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे.
कशी दिसते डांगी गाय?:- देशी डांगी गाईचे काने लहान असतात शिवाय डोके देखील इतर गाईंच्या तुलनेत लहान असते. या जातीच्या गाईंचे शिंगे लहान आणि आकाराने जाड असतात. या जातीच्या खांद्याचा आकार हा लहान असतो. या गायीच्या शरीरावर काळे आणि लाल ठिपके आढळतात जे कि या गाईला इतरांपेक्षा वेगळे बनवतात.
गाईचा आहार कसा आहे:- ही गाय विशेषता दूध उत्पादनासाठी पाळी जाते. यामुळे या गाईला पौष्टिक खाद्य आणि हिरवा चारा खाण्यासाठी द्यावा असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देत असतात. हिरव्या चाऱ्यामध्ये ही गाय नेपियर, सुदान गवत, बाजरी, हत्ती गवत, गवार चा पाला, चवळीचा पाला इत्यादी चारा खात असते. तसेच धान्यात कोंडा, तांदूळ, ढेप, डाळींचा चुरा, भुईमूग, ज्वारी बाजरी, हरबरा, गहू, मका इ. धान्य खाते.
किती दुध देईल:- एका वेतात 100 ते 400 दिव.स दूध देण्याची या गायीची क्षमता आहे. म्हणजेच इतर गायींच्या तुलनेत ही गाय जास्त दिवस दूध देते. तसेच या गायीच्या दुधातील फॅटचे प्रमाण हे 4.3% एवढे आहे. जे कि सामान्य आहे. ही गाय दिवसाला जवळ जवळ 40 लिटर दुध देते. निश्चितच ही गाय सर्वात जास्त दूध देणारी देशी गाय म्हणून ओळखली जाते.