Cow Rearing : देशाच्या ग्रामीण भागात शेतीनंतर (Farming) पशुपालन (Animal Husbandry) हा सर्वात मोठा उत्पन्नाचा (Farmer Income) स्रोत आहे. त्यातही शेतकऱ्यांमध्ये (Farmer) गायींचे पालन (Cow Farming) सर्वाधिक लोकप्रिय आहे.
ग्रामीण भागावर नजर टाकल्यास अनेक ग्रामस्थ दुधाच्या व्यवसायातून चांगला नफा कमावत असल्याचे दिसून येईल. मात्र असे असले तरी गाय पालनातून चांगली कमाई करण्यासाठी शेतकरी बांधवांना सुधारित जातींच्या (Cow Breed) गाईचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी गायीच्या एका सुधारित जातीची माहिती घेऊनच आलो आहोत. आज आपण गाईच्या लाल कंधारी दाते विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लाल कंधारी गाय : लाल कंधारी गाय महाराष्ट्रातील कंधार तालुक्यात आढळते. मात्र आता त्यांची संख्या इतर राज्यांमध्येही वाढली आहे. या गायीचे पालन करणे हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार मानला जातो. गाईची ही जात चौथ्या शतकात कंधारच्या राजांनी विकसित केली होती, असे मानले जाते. निश्चितच या गाईला ऐतिहासिक महत्त्व देखील प्राप्त आहे. अशा परिस्थितीत या गाईचे पालन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
जास्त कष्ट घ्यावे लागत नाही:- या गाईच्या संगोपनासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. त्याला खायला जास्त चारा लागत नाही. या जातीच्या गायी गडद तपकिरी आणि गडद लाल रंगाच्या असतात. आणि त्यांचे कान लांब असतात. या जातीची गाय 40 ते 50 हजार रुपयांना विकली जाते.
आवश्यकतेनुसार खुराक द्यावा:- या जातीच्या गायीला गरजेनुसार आहार द्यावा. शेंगांचा चारा देण्यापूर्वी त्यात तुरीचा किंवा इतर चारा मिसळावा म्हणजे अपचन होत नाही. याशिवाय त्यांच्या गोठ्याचे व्यवस्थापन योग्य असावे. व्यवस्थापन जितके चांगले तितके चांगले उत्पादन आणि नफा मिळवता येतो.
इतके दिवस दूध देते ही गाय :- ही जात एका वर्षात 230 ते 275 दिवस दूध देऊ शकते. भाकडं कालावधी 130 ते 190 दिवसांपर्यंत दूध देऊ शकतो. तसेच दररोज दीड ते चार लिटर दूध देण्याची क्षमता आहे. गायीचा पहिला वेताचा कालावधी 30 ते 45 महिने असतो, तर सरासरी प्रजनन कालावधी 360 ते 700 दिवस असतो.