Cow Farming Tips : भारतात शेती व्यवसायाच्या (Farming) अगदी प्रारंभीपासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन (Animal Husbandry) केले जात आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील पशुपालन मोठ्या प्रमाणात करत असतात. राज्यातील शेतकरी बांधव गाईंचे पालन (Cow Rearing) सर्वाधिक करतात.
मित्रांनो गाय पालन व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली कमाई (Farmer Income) होत आहे. हेच कारण आहे की दिवसेंदिवस गाय पालन (Cow Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गाय पालनातून चांगली कमाई करण्यासाठी शेतकरी बांधवांनी गाईच्या चांगल्या सुधारित जातींचे संगोपन केले पाहिजे.
अशा परिस्थितीत आज आपण भारतात पाळल्या जाणाऱ्या पाच अव्वल गाईंच्या जातींची (Cow Breed) माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो बाजारात केवळ गाईच्या दुधालाच नाही तर पनीर, दही, मावा आणि गाईच्या दुधापासून बनवलेले शेण आणि गोमूत्र यांनाही मागणी वाढत आहे. विशेषत: गायीच्या A2 दूधाने सर्वोत्कृष्ट उत्पादनांपैकी एक म्हणून लोकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
त्यामुळेच आता बहुतांश शेतकरी बांधवांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून गायी पाळण्यास सुरुवात केली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, केंद्र आणि राज्य सरकारांकडून गायींच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना गायींच्या पालनावर अनुदानही दिले जात आहे, जेणेकरून देशी गायींच्या लोकप्रियतेसोबतच त्यांची उपयुक्तताही वाढवता येईल. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया भारतात पाळल्या जाणाऱ्या टॉप पाच गाईंच्या जाती.
साहिवाल गाय :- मित्रांनो साहिवाल गाय ही गायीची एक देशी जात असून आपल्या भारतात या जातीचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. या जातीची गाय वायव्य भारत आणि पाकिस्तानमध्ये पाळली जाते. साहिवाल गायीचा रंग लाल आणि पोत लांब असतो. या गाईला लांब कपाळ आणि लहान शिंगे इतर गायींपेक्षा वेगळे करतात. सैल शरीर आणि जड वजन असलेल्या या जातीची गाय एका वेतात 2500 ते 3000 लिटर दूध देत असल्याचा दावा जाणकार करत आहेत.
गीर गायीची शेती :- गिर गाय हे देखील एक भारतीय वंशाची गाय आहे. गुजरातच्या गीर जंगलातील गीर गायीची लोकप्रियता जगभर पसरली आहे. गिर जंगलाला या जातीच उगमस्थान म्हणून ओळखलं जातं. यामुळे जातीच्या गाई ला गिर नाव पडले. या जातीची गाय एका वेतात 1500-1700 लिटर दूध देते. मध्यम शरीर आणि लांब शेपटी असलेल्या या गायीचे कपाळ मागे वळून शिंगे वाकलेली असतात. गीर गायीच्या शरीरावर ठिपके असतात, त्यामुळे या जातीची गाय ओळखणे सोपे जाते.
लाल सिंधी :- या जातीचा उगम हा पाकिस्तान मध्ये असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लाल सिंधी गाय ही आज उत्तर भारतातील पशुपालकांसाठी उत्पन्नाचे साधन बनली आहे. आपल्या भारतात या जातीचे भल्या मोठ्या प्रमाणावर संगोपन बघायला मिळते. लाल रंगाची आणि रुंद कपाळ असलेली ही गाय एका वेतात 1600-1700 लिटर दूध देऊ शकते.
गौळाऊ गाय :- या जातीची गाय साधारणपणे सातपुड्यातील तराई भागात आढळते, जी चांगल्या प्रमाणात दूध देते. महाराष्ट्रातील वर्धा, नागपूर, मध्य प्रदेश मधील सिवनी आणि बहियार येथे या जातीच्या गाईचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. पांढरा रंग आणि मध्यम आकाराची ही गाय अतिशय चपळ असून, कान उंच करून चालते.
थारपारकर गाय :- गायचे ही जात विशेषता दुग्ध उत्पादनासाठी ओळखले जाते. ही देखील एक भारतीय वंशाची जात असून या जातीचे संगोपन कच्छ, जैसलमेर, जोधपूर आणि सिंधच्या दक्षिण-पश्चिम वाळवंटात मोठ्या प्रमाणात केले जाते. ही गाय कमी काळजी आणि कमी आहारात देखील चांगले दूध उत्पादन देऊ शकते. थारपारकर गायी या दुग्धोत्पादक आहेत, तसेच त्यांचा खाकी, तपकिरी किंवा पांढरा रंग त्यांना इतर गायींपेक्षा वेगळी ओळख देतो.