Cow Farming Tips : भारतात पशुपालन (Animal Husbandry) हा शेतीबरोबरच केला जाणारा एक प्रमुख शेतीपूरक व्यवसाय (Agriculture Business) आहे. हा व्यवसाय संपूर्ण भारतवर्षात केला जातो. पशुपालन व्यवसाय हा प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी (Milk Production) केला जातो.
आपल्या राज्यातही गायी (Cow Rearing) तसेच म्हशीचे मोठ्याप्रमाणात संगोपन केले जाते. मित्रांनो अनेकदा पशुपालक शेतकरी तक्रार करत असतात की, त्यांच्या गाई-म्हशी गाभण (Animal Care) राहण्यास अडचण निर्माण होत आहे.
अनेकदा गाई-म्हशींना तीनदा रेतन करून देखील गाई म्हशी गाभण राहत नाहीत. वारंवार गाई म्हशी उलटत असतात. जाणकार लोक सांगतात की, ज्या गाई-म्हशीमध्ये दुधाचे प्रमाण अधिक असते अशा गाई म्हशी वारंवार उलटतात. मित्रांनो खरे पाहता गाई आणि म्हशीमध्ये माजाचे चक्र प्रत्येक 21 दिवसांनी येत असते.
यावेळी तीनदा रेतन केल्यानंतर देखील गाई म्हशी गाभण राहत नसतील तर यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात. मित्रांनो, गाईम्हशी वारंवार उलटण्याची अनेक कारणे सांगितली गेली आहेत. मात्र यामध्ये भरून दोष आणि फलनातील दोष हे दोन कारण प्रामुख्याने बघायला मिळतात.
रेतन केल्यानंतर जर फलनाची क्रिया योग्य पद्धतीने झाली तर गाई किंवा म्हशी उलटत नाहीत. म्हणजे फलनाची क्रिया योग्य झाल्यास गाय किंवा म्हैस गाभण राहते. मात्र रेतन केल्यानंतर फलनाची क्रिया योग्य न झाल्यास गाई किंवा म्हशी पुन्हा 21 दिवसांनी माजावर येत असतात. अशा परिस्थितीत पशुपालक शेतकरी बांधवांनी काही उपाययोजना केल्या पाहिजेत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने (NDDB) जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर काही उपाययोजना सुचवल्या आहेत. या बोर्डाने सुचवलेल्या उपाययोजना या घरगुती तसेच नैसर्गिक असल्याने यामुळे जनावरांना दुसरा कोणताच धोका राहत नाही.
बोर्डाने सुचविलेल्या शिफारशींनुसार गाई किंवा म्हशी गाभण राहत नसतील तर खाली दिलेले पदार्थ क्रमवार दिवसातून एकदा गुळ आणि मिठासोबत खाऊ घालावे.
एक मुळा दररोज पाच दिवस
कोरफडीचे एक पान दररोज असे चार दिवस
चार मुळी हडजोड चार दिवस
चार मुठी कडीपत्ता व हळद चार दिवस
मित्रांनो लक्षात ठेवा की वर दिलेला उपचार माजाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसापासून करावा लागणार आहे. निश्चितच या नैसर्गिक घरगुती उपचारामुळे गाई म्हशी गाभण न राहणे या समस्येचे निराकरण होणार आहे.